विमान अन हेलिकॉप्टरचा भीषण अपघात ! विमानाचे हवेतच तुकडे-तुकडे
विमान अन हेलिकॉप्टरचा भीषण अपघात ! विमानाचे हवेतच तुकडे-तुकडे
img
Nandini khandare More
गेल्या काही दिवसांपासून विमान अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली असून अनेक भीषण दुर्घटना घडल्या आहेत. पुन्हा एकदा अशाच एका विमान अपघाताची घटना समोर आली आहे. हेलकॉप्टर विमानाला धडकून भीषण अपघात झाला आहे. पेनसिल्व्हेनियामधील कार्लाइलमध्ये धावपट्टीजवळ हा अपघात घडला आहे. 

सेसना 150 नावाचं विमान पोलिसांच्या बेल 407 हेलिकॉप्टरला धडकलं, या भीषण अपघातामध्ये विमानातील पायलटचा मृत्यू झाला आहे, तर हेलिकॉप्टरमध्ये असलेले पोलीस या अपघातामधून थोडक्यात बचावले आहेत. पेनसिल्व्हेनियाचे पोलीस कमिश्नर लेफ्टनंट कर्नल जॉर्ज बिवेन्स यांनी दिलेल्या माहितीनुसार सेसना 150 नावाचं हे विमान अचानक हेलिकॉप्टरच्या दिशेनं वळलं, त्यानंतर विमानावरील कंट्रोल सुटून भीषण अपघात झाला. ही धडक एवढी जबरदस्त होती की, अपघातानंतर विमानाचे तुकडे-तुकडे झाले. या विमानामध्ये पायलट सोडता कोणीही प्रवासी नव्हते. मात्र या अपघातामध्ये पायलटचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

दुसरीकडे या अपघातातून हेलिकॉप्टरमध्ये असलेले पोलीस थोडक्यात बचावले असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. विमानाला धडकून जेव्हा हेलिकॉप्टर खाली कोसळलं तेव्हा हे दोन पायलट त्यामध्ये अडकले होते. त्यांना खिकडी फोडून बाहेर काढण्यात आलं, हे पोलीस ट्रेनिंग घेत होते, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. विमान आणि या हेलिकॉप्टरची हवेतच धडक झाल्याचं बोललं जात आहे. या अपघाताचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. हेलिकॉप्टर विमानाला धडक्यानंतर विमानाचे तुकडे झाले आहेत. यावरून हा अपघात किती भीषण होता, याचा अंदाज येतो. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group