निकृष्ट दर्जाच्या पोषण आहाराचा पर्दाफाश करणाऱ्या अंगणवाडी सेविकेचे आधी निलंबन !  टीका होताच कारवाई मागे; काय आहे प्रकरण ?
निकृष्ट दर्जाच्या पोषण आहाराचा पर्दाफाश करणाऱ्या अंगणवाडी सेविकेचे आधी निलंबन ! टीका होताच कारवाई मागे; काय आहे प्रकरण ?
img
Nandini khandare More
आंबेगाव तालुक्यातील चास ठाकरवाडी ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या नंबरवाडी अंगणवाडी केंद्रातील पोषण आहाराच्या दर्जावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या अंगणवाडी सेविका रेशमा शिवाजी पारधी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. अंगणवाडीत उपलब्ध झालेल्या कथित निकृष्ट दर्जाच्या पोषण आहाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभागाने ही कारवाई केली. दरम्यान आता मात्र पोषण आहाराच्या निकृष्ट दर्जाचा मुद्दा सोशल मीडियातून मांडणाऱ्या अंगणवाडी सेविका देवयानी पारधी यांच्यावरील निलंबनाची कारवाई अखेर मागे घेण्यात आली आहे. 

काय आहे प्रकरण ? 

अंगणवाडीमध्ये लहान मुलांना दिला जाणारा पोषण आहार हा निकृष्ट दर्जाचा असल्याचा व्हिडीओ एका अंगणवाडी सेविकेने सोशल मीडियावर शेअर करत तक्रार केली होती. अंगणवाडीमध्ये लहान मुलांना दिला जाणारा पोषण आहार हा निकृष्ट दर्जाचा असल्याचं सांगत पांढरा वाटाणा आणि भरडा कुकरच्या ९ ते १० शिट्ट्यानंतरही शिजत नाही. त्यामुळे अशा निकृष्ट आहारावर निर्बंध घालण्याची मागणी अंगणवाडी सेविका रेश्मा पारधी यांनी केली होती. या व्हिडीओमध्ये अंगणवाडी सेविका रेश्मा पारधी यांनी या निकृष्ट आहाराच्या संदर्भात एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना देखील विनंती करताना दिसत आहेत. या अंगणवाडी सेविकेने व्हिडीओ शेअर करत सत्य मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर अंगणवाडी सेविका रेश्मा पारधी यांना निलंबित करण्यात आले होते.

दरम्यान आता मात्र पोषण आहाराच्या निकृष्ट दर्जाचा मुद्दा सोशल मीडियातून मांडणाऱ्या अंगणवाडी सेविका देवयानी पारधी यांच्यावरील निलंबनाची कारवाई अखेर मागे घेण्यात आली आहे. चिमुकल्यांना दिल्या जाणाऱ्या आहाराचा दर्जा दाखवणारा त्यांनी एका व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला होता. त्यानंतर सेविकेला निंलबित करण्यात आलं होतं. निलंबनाच्या करवाईवरून प्रशासनावर टीका केली जात होती. त्यानंतर प्रशासनाने निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

अंगणवाडीतील लहान मुलांना आणि गरोदर मातांना दिला जाणारा पोषण आहार निकृष्ट असल्याचा दावा करत सेविका देवयानी पारधी यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओनंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र, या कारवाईनंतर पोषण आहाराच्या दर्जाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. अखेर प्रशासनाने देवयानी पारधी यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेतली आहे. त्यामुळे सेविकेला दिलासा मिळाला असून, आता पोषण आहाराच्या दर्जाबाबत प्रशासन पुढे काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागलं आहे.

पुण्यातील आंबेगाव तालुक्यात अंगणवाडीतील निकृष्ट पोषण आहाराचा पर्दाफाश करणाऱ्या देवयानी पारथे यांचे निलंबन अखेर प्रशासनाकडून मागे घेण्यात आले आहे. लहान मुलांच्या आरोग्याशी होणाऱ्या हेळसांडीविरोधात आवाज उठवल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. 'साम टीव्ही'ने ही बातमी लावून धरत सत्य समोर आणल्यानंतर प्रशासनाला हा निर्णय मागे घ्यावा लागला आहे. निलंबन मागे घेतल्यानंतर, "नोकरी गेली तरी चालेल, पण मुलांच्या आरोग्याशी खेळ होऊ देणार नाही आणि भविष्यातही असा प्रकार घडल्यास पुन्हा आवाज उठवेन," असा ठाम निर्धार देवयानी पारधे यांनी व्यक्त केला आहे.

कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन पोषण आहाराचा वाटाणा शिजेना शालेय पोषण आहारामध्ये अंगणवाडीतील लहानशा लेकरांना देण्यात येणारा वाटाणा आणि भरडा शिजता शिजत नसल्याने पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविका रेश्मा पारधी यांनी जळजळीत वास्तव समोर आणलं. भिजत घातलेला वाटाणा सुद्धा कुकरमध्ये 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा शिजत नसल्याने असला खाणा देणं बंद करा, अशी मागणी, एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे केली होती.
इतर बातम्या
Join Whatsapp Group