नाशिक जिल्ह्यात
नाशिक जिल्ह्यात
img
Nandini khandare More

नाशिक जिल्ह्यातून एक मोठी बातमी सामोर आली आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवर बनावट नोटा छापणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.  नाशिक ग्रामीण आणि शहर पोलीस दलाने संयुक्तिक कारवाई केली आहे. तळेगाव येथील एका खासगी बंगल्यामध्ये छुप्या पद्धतीने सुरू असलेला बनावट नोटांचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला असून, घटनास्थळावरून लाखो रुपयांच्या बनावट नोटांसह छपाईचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांच्या पथकाने तब्बल पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. नाशिक ग्रामीण विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली ही मोठी कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारखान्यात अत्यंत वेगळ्या क्लृप्तीचा वापर करून बनावट नोटा तयार केल्या जात होत्या. खऱ्या चलनी नोटा एका विशिष्ट केमिकलमध्ये बुडवून, त्या नोटांची शाई (Ink) दुसऱ्या कागदावर वटवून हुबेहूब दिसणाऱ्या बनावट नोटा तयार केल्या जात होत्या. या रॅकेटमधील आरोपी 10 लाख रुपयांच्या खऱ्या चलनी नोटांच्या बदल्यात 30 लाख रुपयांच्या बनावट नोटा देण्याचे आमिष दाखवून व्यवहार करत होते. असाच एक व्यवहार सुरू असताना पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली.

याप्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी त्वरित कारवाई करत 5 जणांना अटक केली आहे. 1. अमरेश्वर आईथा (तेलंगणा)2. दासरी सत्यइ (तेलंगणा)3. गोकुळ दाते (तळेगाव, नाशिक)4. हिरामण दाते (तळेगाव, नाशिक) 5. मच्छिंद्र घनदाट (सातपूर, नाशिक)अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. या कारवाईमुळे नाशिकसह तेलंगणा राज्यापर्यंत पसरलेल्या मोठ्या रॅकेटचे धागेदोरे समोर आले असून, या प्रकरणात आणखी कोण-कोण सामील आहे, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group