नाशिक :- नांदुरी ते सप्तशृंगी गड या राज्य मार्ग क्रमांक २१ वरील घाट मार्गामध्ये रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने १० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ७ वाजेपासून ते २६ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत या रस्त्यावरील वाहतूक बंद राहणार आहे, त्यानुषंगाने या कालावधीत वाहनचालक, प्रवाश्यांनी व नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन कळवण आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उ. गो. पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.