९ सप्टेंबर २०२६
आपली मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील सोळा वर्षीय मुलीचा जन्मदात्या आईने 37 वर्षीय व्यक्तीसोबत विवाह लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार पिंपळगाव बसवंत येथे उघडकीस आला आहे.
या प्रकरणी पीडित मुलीच्या आईसह नवरदेवाविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळगाव बसवंत येथील एका हॉटेलमध्ये 24 जून रोजी हा विवाह लावण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गांगुर्डे करीत आहे
Copyright ©2026 Bhramar