नाशिक : नाशिक शहरातील अंबड १३२ केव्ही विद्युत उपकेंद्रामधून निघणाऱ्या ३३ केव्ही सिडको-१ या वीज वाहिनीच्या तातडीच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामाकरिता, दत्त चौक विद्युत उपकेंद्र मधून निघणाऱ्या सर्व विद्युत वाहिन्यांचा वीज पुरवठा बुधवारी दिनांक ०९ सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० ते दुपारी ०२:३० वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
सदर वाहिन्या बंद असल्याकारणाने खालील परिसरातील वीज पुरवठा प्रभावित राहील. यामध्ये राणा प्रताप चौक, अंबड पोलीस स्टेशन, महाले फार्म, उत्तम नगर, पवन नगर, त्रिमूर्ती चौक, लेखानगर, खांडे मळा, खोडे मळा, शिवाजी चौक, महाकाली चौक, शिवशक्ती चौक, दिव्या ॲड लॅब आणि सिडकोचा संपूर्ण भाग.
देखभाल व दुरुस्तीचे काम नियोजित वेळेअगोदर पूर्ण झाल्यास किंवा तांत्रिक कारणास्तव वेळ लागल्यास त्यानुसार वीज पुरवठा सुरू करण्यात येईल. तरी संबंधित ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या नाशिक शहर विभाग १ कडून करण्यात आले आहे.