संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आज एक महत्त्वाचं विधेयक सादर होण्याची शक्यता आहे. एका राज्याचं नाव बदलण्याच्या प्रस्तावामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. आज संसदेत हे विधेयक मांडलं जाणार असल्याने त्यावर सत्ताधारी आणि विरोधकांकडून काय प्रतिक्रिया उमटतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
केरळच्या नावात बदल केंद्र सरकारकडून आज लोकसभेत काही महत्त्वाची विधेयके मांडण्याची तयारी सुरू आहे. यामध्ये केरळच्या नावात बदल करण्यासंदर्भातील विधेयकाचा समावेश आहे. तसेच राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाशी संबंधित कायद्यात सुधारणा करणारे विधेयकही लोकसभेत मांडले जाणार आहे. त्यामुळे आजचे कामकाज राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे.
FCRA दुरुस्ती विधेयकाला विरोध काँग्रेसने FCRA दुरुस्ती विधेयकाला तीव्र विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. या विधेयकावरूनही सरकार आणि विरोधकांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून या मुद्द्यावर संसदेत सरकारला जाब विचारला जाणार आहे. दुसरीकडे, राज्यसभेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या वतीने एका महत्त्वाच्या विधेयकाचे सादरीकरण केले जाणार आहे. त्यामुळे दोन्ही सभागृहांतील आजचे कामकाज गदारोळ आणि राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी रंगण्याची शक्यता आहे. सरकार महत्त्वाची विधेयके चर्चेतून पुढे नेण्यात यशस्वी ठरते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.