लाडक्या बहिणींना  'या' तारखेला मिळणार १५०० रुपये; अपडेट समोर
लाडक्या बहिणींना 'या' तारखेला मिळणार १५०० रुपये; अपडेट समोर
img
Nandini khandare More
लाडक्या बहिणींसाठी  गुड न्यूज आली आहे. जुलै महिन्याच्या १५०० रुपयांच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या पात्र महिलांची प्रतीक्षा आता संपण्याची शक्यता आहे. खात्रीलायक सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्यात म्हणजेच १५ ऑगस्टपूर्वी पात्र महिलांच्या बँक खात्यात जुलै महिन्याचे पैसे जमा होण्याची दाट शक्यता

मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडक्या बहिणींच्या निधीचे थेट हस्तांतरण (DBT) करण्याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी योजनेचा जून महिन्याचा हप्ता १५ जुलै रोजी महिलांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला होता. प्रत्येक महिन्यात १० तारखेपर्यंत लाडकीचा हप्ता जमा केला जाईल, असा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यानुसार निधी वर्ग केला जातो.

जर काही तांत्रिक कारणांमुळे १८ ऑगस्टपर्यंत जुलैचा हप्ता जमा झाला नाही, तर थेट रक्षाबंधन सणाच्या मुहूर्तावर जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण ३००० रुपये एकत्र खात्यात जमा केले जातील, असा अंदाजही काही विश्लेषकांकडून व्यक्त केला जात आहे. सरकारी सूत्रांनुसार, राज्यातील सुमारे १ कोटी ६६ लाख पात्र महिलांच्या खात्यात १५ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट या कालावधीत जुलै महिन्याचा हप्ता टप्प्याटप्प्याने जमा केला जाईल.
इतर बातम्या
Join Whatsapp Group