दहीहंडीला सुट्टी नाही! ‘या’ सणाला मिळणार सरकारी सुट्टी; सरकारचा मोठा निर्णय
दहीहंडीला सुट्टी नाही! ‘या’ सणाला मिळणार सरकारी सुट्टी; सरकारचा मोठा निर्णय
img
Nandini khandare More
महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील स्थानिक सुट्ट्यांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. दहीहंडीच्या दिवशी मिळणारी स्थानिक सुट्टी आता रद्द करून त्याऐवजी रक्षाबंधनाच्या दिवशी सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात प्रशासनाकडून अधिकृत आदेश जारी करण्यात आला असून, नेमका हा बदल कुठे आणि कोणत्या कार्यालयांना लागू होणार आहे, याबाबतही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. याबाबतचे अधिकृत पत्रक प्रशासनाकडून जारी करण्यात आले आहे.

पत्रकानुसार, गोपाळकाला हा सण ५ सप्टेंबर २०२६ रोजी आहे. पण स्थानिक सुट्टीच्या नियोजनात बदल करण्यात आला असून रक्षाबंधनासाठी स्थानिक सुट्टी देण्यात आली आहे. रक्षाबंधन २८ ऑगस्ट २०२६ रोजी असेल. रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा सण मानला जातो. या दिवशी बहिण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ तिच्या संरक्षणाची तसेच सदैव साथ देण्याची भावना व्यक्त करतो.

दुसरीकडे, दहीहंडी हा महाराष्ट्रातील विशेषत: मुंबई, ठाणे आणि परिसरात मोठ्या उत्साहात साजरा होणारा सण आहे. श्रीकृष्णाच्या बाललीलांशी संबंधित या उत्सवात गोविंदा पथकांकडून मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडली जाते. ढोल-ताशे, संगीत आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे या उत्सवाला मोठी रंगत येते.

पण यंदाच्या स्थानिक सुट्टीच्या नियोजनात दहीहंडीऐवजी रक्षाबंधनाला प्राधान्य देण्यात आलं आहे. त्यामुळे सुट्टीच्या तारखेबाबत नागरिक, विद्यार्थी, कर्मचारी आणि विविध संस्थांनी प्रशासनाच्या अधिकृत सूचनेकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.

महत्त्वाचं म्हणजे, मिळालेल्या माहितीनुसार अधिकृत पत्रकामध्ये ५ सप्टेंबर रोजी दहीहंडी म्हणून नमूद आहे. तसेच रक्षाबंधनाची तारीख २८ ऑगस्ट अशी नमूद करण्यात आली आहे. फडणवीस सरकारचा हा मोठा निर्णय आहे. त्यामुळे सुट्टीचा नेमका दिवस आणि लागू क्षेत्र याबद्दल संबंधित प्रशासनाच्या आदेशाची खात्री करणं आवश्यक आहे. या निर्णयामुळे सणांच्या काळात सुट्ट्यांचे नियोजन करणाऱ्या नागरिकांना काहीसा बदल करावा लागू शकतो.
इतर बातम्या
Join Whatsapp Group