नाशिक मध्यवर्ती वाहतुकीत आज बदल !  ''हे'' मार्ग बंद ?
नाशिक मध्यवर्ती वाहतुकीत आज बदल ! ''हे'' मार्ग बंद ?
img
Nandini khandare More

नाशिक मध्यवर्ती वाहतुकीत आज मोठा बदल  करण्यात आला आहे .  साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त आज, शनिवारी (दि.१) शहरात मिरवणूका निघाल्या असून या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी  वाहतुकीत मोठे बदल केले आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस उप आयुक्त चंद्रकांत गवळी यांनी हे निर्बंध लागू केले आहेत. 

पंचवटीकडून नाशिकरोडकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग

मार्ग १ : दिंडोरी नाका – पेठनाका मखमलाबाद नाका बायजाबाई छावणी अशोक स्तंभ – सीबीएस -मुंबई नाका वडाळा नाका-नागजी सिग्नल अशोका मार्ग.
मार्ग २: (रामवाडी) बायजाबाई छावणी -चोपडा लॉन्स गंगापूर नाका अशोक स्तंभ – सीबीएस – मुंबई नाका.

नाशिकरोडकडून पंचवटीकडे येण्यासाठी पर्यायी मार्ग

उपनगर सिग्नल फेम सिग्नल नागजी सिग्नल अशोका मार्ग – वडाळा नाका गडकरी चौक मुंबई नाका सीबीएस सिग्नल अशोक स्तंभ रविवार कारंजा मालेगाव स्टँड मार्गे व सिटीलिंक बसेस तपोवन बस डेपो येथून सुटतील

खालील मार्ग सकाळी १० पासून ते मिरवणूक संपेपर्यंत बंद राहतील

मुख्य मिरवणूक मार्गः महात्मा फुले पोलीस चौकी चौक मंडई हाजी टी पॉईंट महात्मा फुले मार्केट – दूध बाजार (अब्दुल हमीद चौक) भद्रकाली मार्केट बादशाही कॉर्नर गाडगे महाराज पुतळा – धुमाळ पॉईंट – सांगली बँक सिग्नल परशुराम सायखेडकर नाट्यगृह नेपाळी कॉर्नर शालीमार चौक खडकाळी -सिग्नल ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा चौक (सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद). अण्णाभाऊ साठे चौक ते साईबाबा हॉस्पिटल ते शिवसेना भवन (कालिदास कलामंदिरासमोरील दोन्ही बाजूंचे मार्ग बंद). अण्णाभाऊ साठे पुतळा ते कालिदास कलामंदिर ते शिवसेना भवन मार्ग
इतर बातम्या
Join Whatsapp Group