गिरीश महाजन यांची आंदोलक विद्यार्थ्यांना थेट धमकी? गुन्हा दाखल झाल्यावर भरती..
गिरीश महाजन यांची आंदोलक विद्यार्थ्यांना थेट धमकी? गुन्हा दाखल झाल्यावर भरती..
img
Nandini khandare More
 गिरीश महाजन यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली. जळगावात पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणांनी मंत्री गिरीश महाजन यांना घेराव घातला. त्याचे कारणही मोठे आहे. मात्र, या तरुणांचे ऐकून घेण्याऐवजी गिरीश महाजन यांनी या तरुणांना थेट धमकी दिली. भाजप जिल्हा कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी रास्ता रोको करत मंत्री गिरीश महाजन यांना घेराव घातल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला.

जिल्हा क्रीडा संकुलात प्रवेश शुल्क दीडशेवरून थेट सहाशे रुपये केल्याने तरुण आक्रमक झाले. शुल्क कमी करून 300 रुपये करावे, अशी मागणी यादरम्यान त्यांनी केली. यावेळी मंत्री गिरीश महाजनांनी तरुणांना आंदोलनाची पद्धत चुकीची असल्याचे खडसावून सांगत नाराजी व्यक्त केली. गुन्हा दाखल झाल्यास पोलिस विभागात भरती होता येणार नाही या शब्दात मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलन करणाऱ्या तरुणांना सुनावले.

आंदोलक विद्यार्थ्यांना गिरीश महाजन यांनी थेट धमकी दिल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या. थेट गुन्हा दाखल झाल्यावर पोलिस विभागात भरती होता येत नाही, असे त्यांनी म्हटले. मंत्री गिरीश महाजन यांनी तरुणांशी मागण्यांसंदर्भात चर्चा केली आणि योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यावर तरुणांनी आंदोलन मागे घेतले. मात्र, सुरूवातीला त्यांची थेट धमकीची भाषा होती.
इतर बातम्या
Join Whatsapp Group