दिल्लीत आंदोलन चिघळलं! पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुरामुळे अनेक विद्यार्थी बेशुद्ध
दिल्लीत आंदोलन चिघळलं! पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुरामुळे अनेक विद्यार्थी बेशुद्ध
img
Nandini khandare More

सध्या देशातीळ घडामोडींना वेग आला असून आता दिल्लीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. कॉकरोच जनता पार्टीचा (CJP) मोर्चा थेट संसदेच्या दारापर्यंत जाऊन पोहोचला. जंतर-मंतरवरून निघालेल्या विद्यार्थ्यांच्या या प्रचंड जमावाला पांगवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर लाठीचार्ज करण्यात आला आहे. पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत. त्यामुळे संसदेच्या बाहेर प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. संसदेबाहेरील परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे दिसत आहे. पोलिसांकडून लाठीचार्ज केला जात आहे, अश्रुधुरांचा वापर केला पण विद्यार्थी एक इंचही मागे हटायला तयार नाहीत. शिक्षणमंत्र्यांनी राजीनमा द्यावा, ही मागणी जोर धरल्याची दिसत आहे.

जंतर-मंतरवरून संसदेकडे निघालेल्या या भव्य मोर्चावर पोलिसांनी भीषण लाठी चार्ज केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. या कडक कारवाईत आणि वाढत्या डिहायड्रेशनमुळे अनेक आंदोलक विद्यार्थी जागीच बेशुद्ध पडले. त्यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या आंदोलनाला विरोधकांचा मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. आम आदमी पक्षाचे बडे नेते मनीष सिसोदिया, अतिशी आणि काँग्रेसचे कपिल सिब्बल हे स्वतः रस्त्यावर उतरून विद्यार्थ्यांना पाठिंबा देत होते, मात्र पोलिसांनी त्यांनाही पुढे जाण्यापासून रोखले. दुसरीकडे, सत्ताधारी खासदार कंगना रणौत यांनी प्रतिक्रिया देत, "संसदेत गोंधळ घालून प्रश्न सुटणार नाहीत, शांततेत चर्चा झाली पाहिजे," असे वक्तव्य केले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group