गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदी खरेदी करणे सर्वसमान्यांना कठीण झाले आहे. तसेच बऱ्याच दिवसांपासून सोन्याच्या दरातील कमालीचा चढ उतार पाहायला मिळाला. दरम्यान आज मात्र सोने खरेदी करण्यासाठी आजचा दिवस हा सर्वसमान्यांसाठी चांगला आहे.
कारण जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचे समोर आले आहे.सराफ बाजारात सोन्याच्या दरात 2 हजार रुपयांची घसरण झाली आहे. तर एक किलो चांदीच्या दरात जवळपास 12 हजार रुपयांची घसरण झाली आहे. हे घसरण मोठी मानली जात आहेत.घसरलेल्या भावामुळे आज 10 ग्रॅम सोन्यासाठी जीएसटीसह 1 लाख 48 हजार 835 मोजावे लागणार आहेत. तर एक किलो चांदीसाठी जीएसटीसह 2 लाख 36 हजार 900 रुपये द्यावे लागणार आहेत.