सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आजची ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. त्यामुळे ग्राहकांचे लक्ष आजच्या सोन्याच्या भावाकडे लागले आहे. आज ३ नोव्हेंबर २०२६ रोजी महाराष्ट्रात २२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोन्याचा दर नेमका किती आहे? १० ग्रॅम सोनं खरेदी करण्यासाठी किती रुपये मोजावे लागणार? जाणून घेऊया आजचे सोन्याचे ताजे दर.आजचा दिवस हा सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी चांगला आहे. कारण आज सोने आणि चांदीचे दर हे चांगलेच घसरले आहेत.
जळगावच्या सराफ बाजारात दिवाळीपूर्वी मोठे फेरबदल झाले आहेत. आज सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दिवाळीच्या आधी झालेली घसरण ही ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे.
आज जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचा दरात १ हजार ५०० रुपयांनी घसरले आहेत. त्यामुळे सोन्याचा दर जीएसटीसह 1 लाख 42 हजार 655 रुपयांवर आले आहेत.