आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे भाव घसरले, आजचे दर काय ?
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे भाव घसरले, आजचे दर काय ?
img
वैष्णवी सांगळे
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात सतत चढ-उतार होत आहे. तीन दिवसांच्या बंदनंतर बाजार आज उघडत आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी देशभरात सोन्याच्या किमती घसरल्या आहेत. उच्चांकापेक्षा सोनं खूप स्वस्त झालं आहे. सोमवार, 6 एप्रिलच्या सकाळी राजधानी दिल्लीमधये 24 कॅरेट सोन्याचे दर 1 लाख 51हजार 070 रुपये प्रति 10 ग्रॅम आहेत. तर मुंबईत हाच दर 1 लाख ४९ हजार १३० रुपये इतका आहे. 

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेटचे १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १,८०० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,४९,१३० रुपये खर्च करावे लागणार आहे. रविवारी हे सोनं १,५०,९३० रुपयांना विकले गेले. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १८००० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १४,९१,३०० रुपये खर्च करावे लागलीत. रविवारी हे सोनं १५,०९,३०० रुपयांना विकले गेले.

आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील चांगलीच घसरण झाली आहे. २२ कॅरेटचे १ तोळा सोनं १,६५० रुपयांनी स्वस्त झाले आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १,३६,७०० रुपये मोजावे लागणार आहे. रविवारी हे सोनं १,३८,३५० रुपयांना विकले गेले. तर २२ कॅरेटचे १० तोळा सोनं १६,५०० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १३,६७,००० रुपये खर्च करावे लागतील. रविवारी हे सोनं १३,८३,५०० रुपयांना विकले गेले.

२४ आणि २२ कॅरेटपाठोपाठ १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १,३५० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १,११,८५० रुपये खर्च करावे लागतील.
इतर बातम्या
Join Whatsapp Group