सोने-चांदीच्या दरात सर्वात मोठी घसरण !पहा आजचे दर काय ?
सोने-चांदीच्या दरात सर्वात मोठी घसरण !पहा आजचे दर काय ?
img
Nandini khandare More

गेल्या अनेक दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात अनेक चढ उतार सुरु असून आता पुन्हा एकदा मोठी अपडेट आली आहे. सोने खरीद दारांसाठी ही एक मोठी खुशखबर आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार , आज सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत पुन्हा एकदा घसरणपाहायला मिळत आहे. जागतिक बाजारपेठेतील मोठ्या प्रमाणावरील विक्री आणि व्याजदरांबाबत अमेरिकन फेडरल रिझर्व्हने  घेतलेली कडक भूमिका यामुळे गेल्या २-३ दिवसांपासून बाजार  दबावाखाली आहे. याचा थेट परिणाम मौल्यवान धातूंच्या दरांवर झाला असून किमती सातत्याने खाली येत आहेत.

२४ कॅरेट सोने: आज २४ कॅरेट सोन्याचा भाव कालच्या (२५ जून) तुलनेत प्रति १० ग्रॅम ९४० रुपयांनी घसरला आहे. काल याची किंमत १,४१,०७० रुपये होती, ती आज घटून १,४०,१३० रुपयांवर आली आहे.

२२ कॅरेट सोने: याचप्रमाणे २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ८६० रुपयांची घसरण झाली आहे. काल १,२९,२२० रुपयांवर असलेले सोन्याचे भाव आज १,२८,३६० रुपयांवर आले आहेत.

चांदीच्या किमतीत काल (२५ जून) प्रति किलो तब्बल १०,००० रुपयांची मोठी घसरण झाली होती. त्या तुलनेत आज चांदीच्या भावात प्रति किलो १०० रुपयांची किरकोळ घसरण दिसत आहे. काल चांदीचा दर प्रति किलो २,३५,००० रुपये होता, तो आज २,३४,९०० रुपये प्रति किलो एवढा आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group