सोने चांदीच्या दरात घसरण ! सोन्याचे आजचे दर काय ? जाणून घ्या
सोने चांदीच्या दरात घसरण ! सोन्याचे आजचे दर काय ? जाणून घ्या
img
वैष्णवी सांगळे
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेचा उद्या सण आहे. या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. पण सोने चांदीचे वाढते दर पाहता सर्वसामान्यांसाठी सोने खरेदी करणे अवघड झाले आहे. दरम्यान अक्षय्य तृतीयेच्या एक दिवस आधीच गुड न्यूज आली आहे. अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्याच्या किंमतीत मोठा उलटफेर झाला असून सोनं-चांदीच्या किमती चांगल्याच खाली घसरल्या आहेत. 



आज , शनिवार 18 एप्रिलच्या सकाळी राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचे भाव खाली घसरून 1,54,340 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहेत. तर मुंबईत 24 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं हे 1,54,190 रुपयांना मिळतंय. एक दिवसापूर्वीच, दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 1600 रुपये, 1.01 टक्क्यांनी घसरून प्रति 10 ग्रॅमसाठी 1, 56, 200 रुपयांवर आला. 

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोन्याचा भाव प्रति औंस 4,786.90 डॉलर आहे. भू-राजकीय तणाव कमी होण्याबाबत अधिक स्पष्टता मिळण्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे, बाजार सावध असून, सोन्याचे भाव मर्यादित कक्षेत आहेत आणि किमती नरम पडल्या आहेत.

सोन्याप्रमाणेच चांदी या दुसऱ्या मौल्यवान धातूच्या किमतीतही घट झालेली दिसून आली. आज 18 एप्रिलच्या सकाळी, चांदीची किंमत घसरली असून एक किलो चांदीसाठी 2,64,900 रुपये इतका भाव आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group