ग्राहकांसाठी खुशखबर ! सोनं आजही स्वस्त, 10 ग्रॅमसाठी आता किती भाव ?
ग्राहकांसाठी खुशखबर ! सोनं आजही स्वस्त, 10 ग्रॅमसाठी आता किती भाव ?
img
Nandini khandare More

जागतिक  तणावाच्या पार्श्ववभूमीवर मागील महिन्यात सोन्याचा दराने उच्चांक गाठला होता. मात्र आता गेल्या आठवड्यापासून या दरात उतरण झाली असून आता ग्राहकांसाठी दिलासा मिलला आहे. दरम्यान आजही आता या भावात वाढ झाली अजूनही भाव स्वस्तच आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, सोमवार, 8 जूनच्या सकाळी देशातील बहुतांश शहरात सोनं आणखीनच स्वस्त झालं. राजधानी दिल्लीत 24 कॅरेटचं 10 ग्रॅम सोन्याची किंमत घसरून आता 1 लाख 55हजार 900 रुपये झाली आहे. गेल्या एका आठवड्यात 24 कॅरेट सोन्याची किंमत 4690 रुपयांपर्यंत घसरली. तर 22 कॅरेट सोनं हे 4300ल रुपयांनी स्वस्त झालंय. अमेरिका-इराण शस्त्रसंधी कराराबाबत असलेली अनिश्चितता यामुळे सोन्यातील नव्या गुंतवणुकीला विराम मिळाला आहे, ते एक प्रमुख कारण आहे. सोन्याचे कमी झालेले दर हे ग्राहकांसाठी दिलासादायक आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचा भाव प्रति औंस 4,470.79 डॉलर्स इतका आहे.

राजाधानी दिल्लीत 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम म्हणजेच 1 तोळा सोन्याचे दर हे 1,55,900 तर 22 कॅरेटटा भाव 1,40,140 रुपये इतका आहे. मुंबई आणि कोलकाता येथे 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1,39,990 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याीच किंमत 1,52,720 रुपये इतकी आहे.

चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा रेट 1,54,900 आणि 22 कॅरेटचा भाव 1,41,900 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. पुणे आणि बंगळुरूत 24 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं हे 1,52,720 रुपयांना तर 22 कॅरेट 10 ग्रॅम सोनं हे 1,39,990 रुपयांना आहे.

ग्राहकांसाठी आणखी एक खुशखबर म्हणजे सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही सातत्याने घट होत आहे. 8 जूनच्या सकाळी चांदीचा भाव प्रति किलोग्राम 2 लाख 64 हजार 900 रुपये इतका होता. गेल्या आठवड्यात चांदीच्या भावात 15 हजार रुपयांची घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्पॉट चांदीचा भाव प्रति औंस 72.79 डॉलर्स इतका आहे. देशांतर्गत बाजारातील सोने आणि चांदीच्या किमतींवर देशांतर्गत आणि जागतिक अशा दोन्ही घटकांचा प्रभाव पडतो.
इतर बातम्या
Join Whatsapp Group