अंधश्रद्धा आणि बाबा बुवा यांच सावट सध्या आता देशासह आंतर राष्ट्रीय दशांमध्ये सुद्धा पाहायला मिळतंय. ऐकून तर नवलच वाटेल अशी एक घटना बाहेर देशातून उघडकीस आली आहे.
आपलं लग्न हे धूमधडक्यात व्हावं, लग्नामध्ये कोणतंही विघ्न येऊ नये, अशी प्रत्येकाची इच्छा असते. महासत्ता असलेल्या अमेरिकेमध्ये देखील आजकाल अनेक तरुण तरुणी आपलं लग्न मोठ्या थाटामाटात करण्यास प्राधान्य देत आहेत. लग्नासाठी आलेल्या प्रत्येकाने प्रदीर्घ काळ आपलं लग्न लक्षात ठेवावं यासाठी लग्न जास्तीत जास्त मोठं करण्यावर भर दिला जात आहे. यासाठी लाखो डॉलर खर्च करण्यात येत आहेत. सध्या अमेरिकेमध्ये लग्नाचा ट्रेंड बदलत आहे. बंदिस्त मंडपात लग्न करण्याऐवजी अनेकजण आपलं लग्न हे मोकळ्या आकाशाखाली करत आहेत. मात्र या काळात पाऊस पडून आपल्या लग्नात काही विघ्न येऊ नये म्हणून हे तरुण आता जादू टोणा करत असल्याचं समोर आलं आहे. लग्नासाठी जादू टोण्याचे तोटगे करण्याचा हा ट्रेंड सध्या अमेरिकेमध्ये जोरदार सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. या नव्या ट्रेंडमुळे संपूर्ण जगाचं लक्ष अमेरिकेकडे वेधलं गेलं आहे.
सध्या हा ट्रेंड एवढा जोरात सुरू आहे की, एका कपलला बंदिस्त मंडपाऐवजी मोकळ्या आकाशाखाली लग्न करायचं होतं. परंतु ज्या दिवशी त्यांचं लग्न होतं, त्याच दिवशी हवामान विभागाने त्या परिसरात पावसाची शक्यता वर्तवली होती. लग्नामध्ये पाऊस प़डू नये, म्हणून या कपलने चक्क दहा मात्रिंकांना बोलावून लग्नात कोणतंही विघ्न येऊ नये, पाऊस पडू नये यासाठी जादू टोणा आणि इतर काही विचित्र पूजाविधी केल्याची माहिती एका रिपोर्टमधून समोर आली आहे.
सध्या अशा पद्धतीने जादू टोणा करणाऱ्या मांत्रिकांची मागणी तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे की, आता तो एक स्वतंत्र व्यवसाय झाला आहे. यामधून मोठ्या प्रमाणात कमाई होत आहे. गेल्या वर्षभरात अशा मांत्रिकांच्या मागणीमध्ये तब्बल 207 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यावरूनच तुम्ही या गोष्टींचा अंदाज व्यक्त करू शकतात. वातावरणावर नियंत्रण मिळवण्यासाठी अशा पद्धतीचे जादू टोणा केला जात आहे. हा आता चर्चेचा विषय ठरला आहे.