Asian Games 2026: भारताच्या लेकींची सुवर्ण भरारी ! चीनचा धुव्वा उडवत थेट जिंकलं सातवं गोल्ड मेडल
Asian Games 2026: भारताच्या लेकींची सुवर्ण भरारी ! चीनचा धुव्वा उडवत थेट जिंकलं सातवं गोल्ड मेडल
img
Nandini khandare More
आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धेत भारताच्या तिरंदाजी महिला संघाने बुधवारची सुरुवात दणक्यात केली आहे.भा रतीय महिला कंपाऊंड तिरंदाजी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत शानदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे. अंतिम सामन्यात भारतीय संघाने चीनचा पराभव करत देशाच्या पदकतालिकेत आणखी एका सुवर्णपदकाची भर घातली. भारताच्या संघात चिकिथा तनिपर्थी, प्रितिका प्रदीप आणि ज्योती सुरेखा वेण्णम यांचा समावेश होता. या तिघींनी भारताला यंदाच्या स्पर्धेतील सातवे पदक जिंकून दिले आहे.

अंतिम फेरीत चीनला भारतीय संघाने पराभवाचा धक्का दिला आहे. भारताने हा अंतिम सामना २३८-२३४ अशा गुणांच्या फरकाने जिंकला आणि सुवर्णपदक जिंकले. भारतीय महिलांनी सुरुवातीपासूनच घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली होती. त्यामुळे त्यांनी महिला कम्पाऊंड सांघिक प्रकारात विश्वविक्रमाचीही बरोबरी केली.

यापूर्वी २०१४ मध्ये कोरिया महिला संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेतच २३८ गुण मिळवून विश्वविक्रम केला होता. त्याच विश्वविक्रमाची बरोबरी आता १२ वर्षांनी चिकिथा, प्रतिका आणि ज्योती यांच्या भारतीय संघाने केली आहे.

पहिल्या फेरीतच भारताच्या तिघींनीही अचूक तीर मारत ६०-५८ अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या फेरीत चिकिताने ९ गुण मिळववे, पण नंतर प्रतिका आणि ज्योती यांनी सावरत १०-१० गुणांचे अचूक तीर मारत आघाडी कायम ठेवली. दुसऱ्या फेरीत चीनने ५८ गुण मिळवले.

तिसऱ्या फेरीतही भारताने ५९ गुण मिळवले, तर चीनने मात्र चांगले पुनरागमन करत ६० गुण मिळवले. तरी तिसऱ्या फेरीनंतर भारताकडे १७८-१७५ अशी आघाडी होती. अखेरच्या फेरीत तिघींनीही अचूक निशाणा साधत ६० गुण मिळवले आणि सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. अखेरच्या फेरीत चीनला ५८ गुणच मिळवता आले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group