प्रसिद्ध मंदिरात मोठी खळबळ ! जवानाच्या रायफलमधून अचानक गोळी सुटली ; तिघे जखमी
प्रसिद्ध मंदिरात मोठी खळबळ ! जवानाच्या रायफलमधून अचानक गोळी सुटली ; तिघे जखमी
img
Nandini khandare More

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिरात शनिवारी सकाळी अचानक घडलेल्या एका घटनेने भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मंदिराच्या गेट क्रमांक 4B जवळ सुरक्षा ड्युटीवर असलेल्या पीएसीच्या जवानाच्या कार्बाइनमधून चुकून गोळी सुटल्याने एकच गोंधळ उडाला. ही गोळी जमिनीवर आदळून तिचे तुकडे उडाल्याने तीन भाविक जखमी झाले. घटनेनंतर परिसरात काही काळ धावाधाव झाली, तर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, मंदिरात कर्तव्यावर तैनात असलेला पीएसी जवानाच्या हातात असलेली कार्बाइन जमिनीवर पडली. त्यानंतर या कार्बाइनमधून गोळी सुटली. ही गोळी जमिनीवर दगडाला आदळली. त्यानंतर दगड थेट भाविकांना लागले, असे सांंगितले जात आहे. मंदिरात जखमी झालेल्या भाविकांची नावे देखील हाती आली आहेत. निक्की गुप्ता, राम बाबू आणि विकास यादव अशी जखमी व्यक्तींची नावे आहेत. या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. या घटनेने काही वेळ मंदिरात खळबळ माजली होती. त्यानंतर तातडीने पोलीस आणि सुरक्षा कर्मचारी जवान घटनास्थळी पोहोचले.

प्राथमिक तपासात कार्बाइन जमिनीवर आदळल्याने घटना घडल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या प्रकरणी संबंधित सुरक्षा एजन्सीची चौकशी सुरू केली आहे. तसेच ही घटना कशी घडली, याचाही तपास पोलिसांनी सुरू केला आहे. घटनेनंतरही मंदिर परिसरात सुरक्षा सामान्य आहे. तसेच मंदिरात दर्शन कोणत्याही अडथळ्याविना सुरू आहे. भाविकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन पोलिसांना केलं.

नेमकी घटना कशी घडली?

पोलीस अधिकारी गौरव बंसवाल यांनी सांगितलं की, मंदिर परिसरात पीएसीच्या जवानाच्या हातातून कार्बाइन सुटली. कार्बाइन जमिनीवर आदळल्याने दोन राऊंड फायर झाले. गोळ्या जमिनींना आदळून मंदिरातील फुलविक्रेत्यांना लागल्या. यामुळे एकाचा हाताला, दुसऱ्याच्या कमरेला आणि तिसऱ्याच्या पायाला दुखापत झाली आहे. या घटनेत तिघेही किरकोळ जखमी झाले आहेत. फुलविक्रेते फार गंभीर जखमी झालेले नाहीत. त्यांच्यावर रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group