नीट पेपरफुटी घोटाळा प्रकरणाच्या विरोधात CJP (कॉक्रोज जनता पार्टी) ने मोठे आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान काल म्हणजेच सोमवारी दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात आंदोलनादरम्यान मोठा तणाव निर्माण झाला. संसद मार्च रोखताना आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यानंतर काही आंदोलक संसद परिसराच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप करण्यात आला. या लाठीचार्जच्या निषेधार्थ विरोधकांनी आता सत्ताधाऱ्यांना घेरलं आहे. दरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे.
दरम्यान, राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि काँग्रेसच्या इतर खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 7, लोक कल्याण मार्ग येथील निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन केले. CJP (कॉक्रोज जनता पार्टी) च्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जचा निषेध करत त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या संपूर्ण प्रकरणामुळे नीट पेपरफुटीचा मुद्दा पुन्हा राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आला आहे. प्रियांका गांधी तसेच इतर नेत्या मांडी घालूनच बसल्या आहेत.