Bank Holiday Alert! ३ नोव्हेंबरला बँका बंद राहणार? महाराष्ट्रातील ग्राहकांसाठी मोठी बातमी!
Bank Holiday Alert! ३ नोव्हेंबरला बँका बंद राहणार? महाराष्ट्रातील ग्राहकांसाठी मोठी बातमी!
img
Nandini khandare More
नोव्हेंबर महिन्यात बँकांना असलेल्या सुट्ट्यांमुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ३ नोव्हेंबर २०२६ रोजी काही राज्यांमध्ये बँकांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बँकाही बंद राहणार का, असा प्रश्न अनेक ग्राहकांना पडला आहे. तुम्हीही ३ नोव्हेंबरला बँकेत महत्त्वाच्या कामासाठी जाण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. महाराष्ट्रात या दिवशी बँका सुरू राहणार की बंद? RBI च्या बँक हॉलिडे कॅलेंडरनुसार जाणून घेऊया सविस्तर माहिती.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) बँक सुट्ट्यांच्या यादीनुसार, उद्या देशातल्या एका राज्यात बँकांना सुट्टी असेल. पण इतर राज्यांमध्ये बँकांचं कामकाज नेहमीसारखंच सुरू राहील. त्यामुळे बँकेत जाण्याआधी सुट्टीचं कारण आणि तुमच्या बँकांची स्थिती जाणून घ्या.

सिक्कीममध्ये बँका का बंद राहणार? RBI च्या हॉलिडे कॅलेंडरनुसार, मंगळवार, ३ नोव्हेंबर रोजी सिक्कीममध्ये बँका बंद राहतील. या दिवशी सिक्कीममध्ये 'ल्हाबाब दुचेन' हा बौद्ध धर्मीयांचा महत्त्वाचा सण साजरा केला जातो.

धार्मिक मान्यतेनुसार, भगवान गौतम बुद्ध स्वर्गातल्या तुषिता लोकातून पृथ्वीवर परतले, त्या घटनेच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. बौद्ध धर्मीयांसाठी या दिवसाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. त्यामुळे सिक्कीममध्ये या निमित्ताने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. तसेच सरकारी आणि खासगी बँकांच्या शाखा बंद राहतील.

महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये बँका सुरू राहणार? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ३ नोव्हेंबर रोजी सिक्कीम वगळता देशातल्या इतर राज्यांमध्ये बँकांचं कामकाज नेहमीसारखं सुरू राहील. त्यामुळे महाराष्ट्रातल्या बँक ग्राहकांना या सुट्टीचा कोणताही परिणाम होणार नाही. 

ग्राहकांना बँकेत जाऊन आर्थिक व्यवहार करता येतील. या आठवड्यात बँकांना आणखी कधी सुट्टी? तर या आठवड्यातल्या बँकांच्या सुट्ट्यांबद्दल बोलायचं झालं तर ३ नोव्हेंबरला सिक्कीममध्ये प्रादेशिक सुट्टी आहे. त्यानंतर ७ नोव्हेंबर हा पहिला शनिवार असल्याने बँका सुरू राहतील. तर ८ नोव्हेंबर रोजी रविवार असल्यामुळे देशातल्या बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.
इतर बातम्या
Join Whatsapp Group