नाशिकमध्ये उद्या
नाशिकमध्ये उद्या "या" भागातील वीज पुरवठा ३ तास बंद राहणार
img
दैनिक भ्रमर

नाशिक : नाशिक शहरामधील  सिडको भागातील दत्त चौक विद्युत उपकेंद्र येथून निघणाऱ्या पवन नगर ११ केव्ही विद्युत वाहिनीवर देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने उद्या दि. २५ जून रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

यामध्ये पवन नगर, सावता नगर, दिव्या ॲडलॅब, रायगड चौक, मटन मार्केट, लोकमान्य नगर, मिलिटरी क्वार्टर, पवन नगर भाजी मार्केट, सप्तशृंगी चौक, कॅप्टन कॉर्नर व परिसर यांचा समावेश असेल. 

देखभाल व दुरुस्तीचे काम नियोजित वेळेअगोदर पूर्ण झाल्यास वीज पुरवठा तात्काळ सुरू करण्यात येईल. तरी संबंधित ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या नाशिक शहर विभाग १ कडून करण्यात आले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group