काँग्रेस विरोधात भाजपा महिलांचे निषेध आंदोलन
काँग्रेस विरोधात भाजपा महिलांचे निषेध आंदोलन
img
सुधीर कुलकर्णी


नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- ‘नारी वंदन’ विधेयकाला काँग्रेसने विरोध केल्याबद्दल व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज नाशिक येथे आले असता त्यांचा निषेध व्यक्त करीत भाजपच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काळे कपडे परिधान करीत होते. काँग्रेस पक्ष व राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणा देत मेहेर चौकात रस्ता रोको करीत तासभर आंदोलन केले.

नारी विधेयकाला विरोध करणार्‍या काँग्रेस पक्षाच्या निषेधार्थ भाजपा महिला, पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने मेहेर चौकात जमले होते. त्यामुळे त्यांनी भरपावसात “काँग्रेस पक्षाचा धिक्कार असो, महिला विधेयकाला विरोध करणार्‍यांचा धिक्कार असो,” आदी घोषणा देत रास्ता रोको केला. काळ्या साड्या, काळे कपडे, दंडाला काळ्या रिबिनी बांधून सकाळी 10 वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने उपस्थित झाले; मात्र पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना मेहेर चौकातच अडवून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाण्यास मज्जाव केला

त्यानंतर आंदोलकांनी मेहेर चौकातच भरपावसात घोषणा देत आंदोलन सुरू केले. हातात बॅनर, डोक्यावर काळ्या टोप्या, काळी रिबिन बांधून कार्यकर्ते भरपावसात घोषणा देत होते. या आंदोलनात भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय उपाध्यक्षा तथा माजी मंत्री भारती पवार, महापौर हिमगौरी आहेर-आडके, आ. प्रा. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, नगरसेविका स्वाती भामरे, रोहिणी नायडू, अमृता पवार, देवांग आदी नगरसेविका, पदाधिकारी व नगरसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

इतर बातम्या
उद्या

Join Whatsapp Group