अंबड गावाजवळ मातीचा ट्रक खड्ड्यात फसला; वाहतुकीचा खोळंबा
अंबड गावाजवळ मातीचा ट्रक खड्ड्यात फसला; वाहतुकीचा खोळंबा
img
Nandini khandare More
नाशिक शहरातील खड्डे ,त्यामुळे होणारे अपघात आणि वाहन फसण्याचे सत्र सतत सुरु असून आता पुन्हा एकदा  पाथर्डी फाट्याकडून अंबड गावाकडे  जाणाऱ्या रस्त्यावर गुरुवारी (दि.३) सकाळच्या सुमारास मातीने भरलेला ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात फसल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र या प्रकारामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

नाशिक शहरात सध्या अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. विविध भागांतील खड्डे बुजविण्याची कामेही केली जात आहेत. मात्र, अनेक ठिकाणी खड्डे केवळ वरवर बुजवले जात असून, त्यासाठी योग्य पद्धतीने डांबर अथवा खडीचा वापर केला जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे पावसामुळे अथवा वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे बुजवलेले खड्डे पुन्हा उखडत असून, रस्त्यांच्या कडेला मोठे खड्डे निर्माण होत आहेत. पाथर्डी फाटा-अंबड गाव मार्गावर घडलेल्या घटनेमुळे खड्डे बुजविण्याच्या कामाच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अवजड वाहन रस्त्याच्या कडेला जाताच चाक खड्ड्यात रुतत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group