पेठ-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पुलावरून कंटेनर कोसळून चालक ठार
पेठ-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पुलावरून कंटेनर कोसळून चालक ठार
img
दैनिक भ्रमर

पेठ  - नाशिक पेठ महामार्गावरील बोरवठफाटा नजिक आज दि.(५) रोजी सकाळी गुजरातकडून नाशिक कडे रंगाचे बॅरिकेट व इतर माल घेऊन जाणारा कंटेनर पुलाचे कठडे तोडून पुलावरून सुमारे पंधरा ते वीस फुट खाली कोसळला.

पुलाखालून पाणी वाहत होते. कंटेनर घसरत पुढे जाऊन पाण्याच्या कडेपर्यंत जाऊन उलटला यात चालक गंभीर जखमी झाला त्यास औषध उपचारा करिता नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला.

या अपघातात कंटेनरचा पुढील भाग चक्काचूर झाला असून  वाहनाचे व मालाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. वाहनाची चेसी तुडुन सांगाडा बाजुला झाला आहे.
इतर बातम्या
उद्या

Join Whatsapp Group