धक्कादायक  ! पोलिसाकडून अल्पवयीन मुलीवरअत्याचार ;  पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न
धक्कादायक ! पोलिसाकडून अल्पवयीन मुलीवरअत्याचार ; पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न
img
Nandini khandare More

राज्यभरात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असून महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कुठल्याही अन्याय अत्याचारातून आपली सुटका करण्यासाठी आपली स्वरक्षणसाठी पोलीस यंत्रणा कार्यरत असते. पण जर याच पोलिसांपासून आपल्याला धोका निर्माण झाला तर ? अशीच एक घटना समोर आली आहे. 

अकोल्यामध्ये पोलिसाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा पोलिस ज्या घरात भाड्याने राहत होता त्याच घरमालकाच्या मुलीसोबत त्याने हे भयंकर कृत्य केले. या घटनेनंतर चिंतेत आलेल्या मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला. या मुलीची प्रकृती गंभीर असून ती कोमात गेली आहे. तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेच्या निषेधार्थ नातेवाईकांसह गावकऱ्यांचा पोलिस उपविभागीय कार्यालयावर ठिय्या आंदोलन सुरू आहे.

'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य. याचाचं विसर पोलिसांना पडलाय. याची प्रचीती देणारी घटना अकोल्यातून समोर आली आहे. अकोल्यातल्या बाळापूरात भाड्याच्या घरात राहणाऱ्या एका पोलिस कर्मचाऱ्याने घरमालकाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केलाय. या घटनेनंतर पीडित मुलीने गळफास घेत आत्महत्याचा प्रयत्न केला. सुदैवाने तिचे प्राण वाचवत कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखले केले. या मुलीची प्रकृती चिंताजनक असून ती सध्या कोमात आहे.

या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिस कर्मचारी फरार आहे. संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांचे नाव पवन वडगावे असं आहे. लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ पीडित मुलीचे नातेवाईकांसह गावकऱ्यांनी पोलिस उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. पवन वडगावे या पोलिस कर्मचाऱ्याला तातडीने अटक करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. या प्रकरणात बाळापुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून तो तिथेच कार्यरत होता. त्यामुळे येथील पोलीसांनी पवन वडगावेला फरार होण्यास मदत केल्याचा आरोप पीडित मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. 

दुसरीकडे हा तपास स्थानिक पोलिसांकडून वरिष्ठ पातळीवर वर्ग करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, घटनेनेनंतर तरुणीने स्वतःला संपविण्याचा प्रयत्न केला. आज पीडित तरुणी ही मृत्यूशी झुंज देत असून अद्यापही आरोपी पोलिस कर्मचाऱ्याला अटक होत नाही. त्यामुळं संबंधित ठाणेदार आणि आरोपी पोलिसाला मदत करणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. या मागणीसाठी शेडको समाज बांधव आणि नातेवाईकांचा पोलिस उपविभागीय कार्यलयासमोर ठिय्या आंदोलन चाललं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group