अंगणवाडी सेविकांना दरमहा २ हजारांचा लाभ ? पण पूर्ण कराव्या लागणार 'या' अटी !
अंगणवाडी सेविकांना दरमहा २ हजारांचा लाभ ? पण पूर्ण कराव्या लागणार 'या' अटी !
img
Nandini khandare More

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या कामाचे मूल्यमापन करून प्रोत्साहन भत्ता देण्याच्या निकषांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यानुसार पात्र अंगणवाडी सेविकांना दरमहा २ हजार रुपयांपर्यंतचा लाभ मिळू शकतो. मात्र, हा लाभ नेमका कोणाला आणि कोणत्या अटींवर मिळणार? जाणून घ्या...

महिला व बालविकास विभागाने प्रोत्साहन भत्त्याच्या नियमांमध्ये बदल केला आहे. आता अंगणवाडी केंद्रांच्या कामाचे दर महिन्याला १० निकषांवर मूल्यांकन होईल. त्यानुसार सेविका आणि मदतनीसांनी ७०० ते २००० रुपयांपर्यंत प्रोत्साहन भत्ता मिळू शकतो. हे नवे निकष नोव्हेंबर २०२६ पासून लागू करण्यात आलं.

किती मिळणार प्रोत्साहन भत्ता? नव्या शासन निर्णयानुसार, अंगणवाडी केंद्राने १० पैकी किमान ७ निकष पूर्ण करणं गरजेचं आहे. किती निकष पूर्ण झाले, त्यानुसार सेविका आणि मदतनीसांच्या भत्त्याची रक्कम ठरवण्यात आली. ७ निकष पूर्ण - सेविका १,४०० रुपये, मदतनीस ७०० रुपये. ८ निकष पूर्ण - सेविका १,६०० रुपये, मदतनीस ८०० रुपये. ९ निकष पूर्ण - सेविका १,८०० रुपये, मदतनीस ९०० रुपये. १० निकष पूर्ण - सेविका २,००० रुपये, मदतनीस १,००० रुपये.

कोणते आहेत नवीन १० निकष? अंगणवाडीमध्ये चालणारे कामकाज तपासण्यासाठी विभागाने १० निकष ठरवले आहेत. यामध्ये दर महिन्याला दोन समुदाय आधारित कार्यक्रम घेणं, पात्र लाभार्थ्यांना २५ दिवस घरपोच आहार देणं आणि तीन ते सहा वर्षांच्या ८० टक्के बालकांची उपस्थिती राखणं याचा समावेश आहे. तसेच ९५ टक्के बालकांना महिन्यातल्या किमान २५ दिवस गरम ताजं जेवण आणि नाश्ता देणं गरजेचं आहे. दर महिन्याला आहार आरोग्य दिन आयोजित करून त्याची पोषण ट्रॅकरवर नोंद करावी लागेल.

अंगणवाडी केंद्र महिन्यात २५ दिवस सुरू ठेवावी लागेल. फेब्रुवारी महिन्यासाठी ही अट २४ दिवसांची असेल. तीन ते सहा वर्षांच्या मुलांसाठी किमान दोन पूर्वशालेय शिक्षण उपक्रम राबवणं, बालकांची उंची आणि वजनाची अचूक नोंद ठेवणं आणि सर्व लाभार्थ्यांच्या गृहभेटी पूर्ण करणंही बंधनकारक असेल. नोव्हेंबर २०२६ पासून नवीन नियम लागू तर या निर्णयानुसार अंगणवाडी केंद्रांचं मूल्यांकन दर महिन्याला पोषण ट्रॅकर अॅमधल्या माहितीच्या आधारे केलंजाईल. त्यामुळे सेविका आणि मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता मिळण्यासाठी नवीन निकष पूर्ण करावे लागतील.

इतर बातम्या
Join Whatsapp Group