आजकाल गुन्हेगारीच्या प्रमाणात चिंताजनक वाढ झाली असून आजकाल तर प्रेम युगुलांमध्ये होणारे वाद आणि त्यातून घडणाऱ्या गंभीर घटना या देखील दिवसागणिक वाढतच आहेत. दरम्यान आता अशीच एक धक्कदायक घटना आता उघडकीस आली आहे.
तरुणाने गर्लफ्रेंडची निर्घृण हत्या केल्याची भयंकर घटना घडली. ठाण्यातील नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत जांभळी नाका परिसरात ही घटना घडली. आरोपी तरुण लॉजमध्ये गर्लफ्रेंडला घेऊन गेला. त्याठिकाी दोघांमध्ये भांडण झाले. वाद इतका टोकाला गेला की तरुाने गर्लफ्रेंडची हत्या केली. त्यानंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेमुळे ठाण्यात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपी नंदकिशोर गाडेकरविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. पोलिसांनी हत्या करण्यात आलेल्या तरुणीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ठाणे जिल्हा सिव्हिल रुग्णालयात पाठवला आहे. तरुणाला आपल्या गर्लफ्रेंडचे दुसऱ्यासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. याच कारणावरून दोघांमध्ये भांडण झाले आणि रागाच्या भरात त्याने तिची हत्या केली.
पोलिसांनी सांगितले की, २१ तारखेला ५ वाजता हॉटेल महाराजा लॉजवर एका कपलने रूम बुक केली होती. रात्री साधारण १० वाजता तरुण रूम सोडून बाहेर निघून गेला. तिथल्या मॅनेजरने हटकले की तुमच्या सोबतच्या मॅडम कुठे आहेत? त्यावर त्याने मॅडम वॉशरूमला गेलात असं सांगून तो निघून गेला. तरुणी बाहेर आली नाही म्हणून तिथल्या स्टाफने रुमची बेल वाजवली. बेलचा रिप्लाय येत नव्हता म्हणून मॅनेजर आणि त्याने दरवाजा उघडला असता तर तरुणी मृतावस्थेत बेडवर पडल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. तरुणीजवळ असलेल्या आधारकार्डवरून तिची ओळख पटली. त्यानंतर तपासातून ही हत्या प्रेमसंबंधातून झाल्याचे उघड झाले.