बॉलिवूडला आयकर विभागाचा दणका! रकुल प्रीतसह अनेक सेलिब्रिटींवर आयकर विभागाचे छापे
बॉलिवूडला आयकर विभागाचा दणका! रकुल प्रीतसह अनेक सेलिब्रिटींवर आयकर विभागाचे छापे
img
Nandini khandare More

बॉलिवूड इंडस्ट्रीवर आयकर विभागाचा मोठा दणका बसला आहे. कारण आता आयकर विभागाने प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि प्रॉडक्शन हाऊसवर मोठी कारवाई सुरु केली आहे

आयकर विभागाने छापे टाकल्यामुळे इंडस्ट्रीला मोठा दणका बसला आहे. मुंबई आयकर विभागाच्या टीमने टॅक्स चोरी आणि सिनेमाच्या नावाखाली परदेशात पैसे पाठवल्या प्रकरणी अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि प्रॉडक्शन हाऊसवर मोठी कारवाई सुरु केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री रकुल प्रीत सिंह, दिग्गज दिग्दर्शक वासू भगनानी आणि पॅनोरमा स्टूडीओ संबंधी 12 ठिकाणांवर सर्च ऑपरेश सुरु करण्यात आलं आहे.

समोर आलेलया  माहितीनुसार आयकर विभागाला गेल्या काही दिवसांपासून माहिती मिळत होती की, सिनेमाचं शुटिंग, परदेशातील वितरण आणि निर्मितीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर रक्कम परदेशात पाठवली जात आहे. या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर करचोरी आणि आर्थिक अनियमितता झाल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. यासंदर्भात, मुंबईतील प्राप्तिकर विभागाची विविध पथके मुंबईतील अनेक कार्यालये आणि परिसरांमध्ये तपासणी करत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group