सोन्याच्या दरात पुन्हा तेजी! लग्नसराईत खरेदीदारांना महागाईचा झटका; चांदीही महागली
सोन्याच्या दरात पुन्हा तेजी! लग्नसराईत खरेदीदारांना महागाईचा झटका; चांदीही महागली
img
Nandini khandare More
लग्नसराईचा हंगाम सुरू असतानाच सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सराफा बाजारात सोन्याच्या दरात पुन्हा वाढ नोंदवण्यात आली असून चांदीचे भावही वधारले आहेत. त्यामुळे दागिने खरेदीचे नियोजन करणाऱ्यांचे बजेट बिघडण्याची शक्यता आहे. आज २४, २२ आणि १८ कॅरेट सोन्याचा दर किती? एक तोळा सोन्यासाठी किती रुपये मोजावे लागणार? जाणून घ्या आजचे ताजे दर.

आजच्या सराफा बाजारातील दरानुसार, सोन्याच्या किमतीत प्रति तोळा १ हजार ७५० रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. या वाढीनंतर १० ग्रॅम सोन्याचा भाव १ लाख २६ हजार ५५० रुपयांवर पोहोचला आहे.

दुसरीकडे, चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. चांदी प्रति १०० ग्रॅममागे ५०० रुपयांनी महागली असून, सध्या तिचा दर १७ हजार रुपयांवर पोहोचला आहे. सध्या लग्नसराईचा काळ असल्याने अनेक कुटुंबांकडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांची खरेदी केली जाते. मात्र, दरवाढीमुळे खरेदी करताना ग्राहकांना आर्थिक गणित जुळवावे लागणार आहे. सोन्या-चांदीचे दर आणखी वाढणार की पुन्हा घसरणार, याकडे आता ग्राहकांसह सराफा व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे. एकूणच, लग्नसराईच्या दिवसांत सोन्या-चांदीच्या वाढत्या किमतींमुळे खरेदीदारांची चिंता वाढली आहे.

२४ कॅरेट सोन्याचे दर (24k Gold Rate Today) १ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १२,६५५ ८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,०१,२४० १० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,२६,५५० १०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १२,६५,५००

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate Today) १ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ११,६०० ८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ९२,८०० १० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,१६,००० १०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर ११,६०,०००

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate Today) १ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ९,४९१ ८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ७५,९२८ १० ग्रॅम सोन्याचे आजचे दर ९४,९१० १०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर ९,४९,१००

इतर बातम्या
Join Whatsapp Group