सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. सोन्याच्या दरात सातत्याने बदल होत असल्याने सोनं खरेदी करावं की नाही असा प्रश्न पडला आहे. सोन्याचे दर मागच्या आठवड्यात घसरले होते. त्यानंतर पुन्हा हे दर वाढले होते. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर घसरले आहेत.सोन्याचे दर घसरल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
अमेरिका आणि इराण यांच्यातील सुरू असलेल्या युद्धाला पाचवा आठवडा सुरू झाल्याने बाजारात अनिश्चितता निर्माण झाली आहे. ब्लूमबर्गच्या मते, या दबावामुळे आज सोन्याचा भाव सुमारे 1.38 % ने घसरून 4462 डॉलर प्रति औंस झाला, तर चांदीचा भाव 2% घसरून 68.3 डॉलर प्रति औंस पातळीवर पोहोचला. भारतातही सोनं-चादींच्या किंमतीत मोठी घसरण दिसून आली.
मुंबई आणि कलकत्ता : सध्या मुंबई, चेन्नई आणि कलकत्ता येथे 22 कॅरेट सोन्याची किंमत 1,35,740 रुपये प्रति 10 अशी आहे, तर 24 कॅरेट सोनं हे 1,48,080 रुपयांनी मिळत आहे.
पुणे आणि बंगळुरूमध्ये दर : या दोन शहरांमध्ये, 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,48,080 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,35, 740 रुपये आहे.
दिल्लीत सोन्याचा भाव : दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमसाठी 1 लाख 48 हजार 210 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1, 35, 890 रुपये इतका आहे.