गुंतवणुकीसाठी आणि दागिन्यांसाठी नेहमीच पसंतीस उतरणाऱ्या सोन्याच्या दरात सध्या मोठी पडझड पाहायला मिळत आहे. इराण-अमेरिका युद्ध आणि जागतिक बाजारपेठेतील अस्थिरतेमुळे सोन्याने आपल्या सर्वकालीन उच्चांकावरून थेट ५०-५२ हजार रुपयांची डुबकी मारली आहे. आज आठवड्याच्या सुरुवातीलाच २४ कॅरेट सोन्याचे दर घसरून १,५१,१३० रुपयांवर आले असून, चांदीच्या दरातही मोठी घट झाली आहे. लग्नसराईच्या काळात ग्राहकांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.
अमेरिक आणि इराणच्या युद्धाचा फटका, डॉलरची किंमत या सर्व गोष्टींचा सराफा बाजारावर परिणाम होताना दिसतो. सोनं- चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांत मोठी घसरण झालेली दिसत आहे. सर्वकालीन उच्चांकापेक्षा सोनं 50-52 हजारांनी खाली आलं आहे. जगातील विविध घडामोडी, इराण-अमेरिका युद्ध,अशांतता यामुळे जागतिक बाजारपेठही अस्थिर असून त्याचा डायरेक्ट परिणाम सोनं आणि चांदीवर झाल्याचं दिसून आलंय. युद्धामुळे दोन्ही मौल्यवान धातूंचे दर अस्थिर झालेले दिसत आहेत.
काही महिन्यांपूर्वी सोन्याने र्वकालीन उच्चांक गाठला, 10 ग्रॅम म्हणजेच एक तोळा सोन्याची किंमत ही 2 लाख रुपयांच्या आसपास होती. मात्र त्यानतंर सोन्याचे दर खाली घसरले. या आठवड्याच्या सुरूवातीला 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे दर खाली घसरलेले दिसून आले. जागतिक घडामोडींचा सोन्याच्या किमतींवर डायरेक्ट परिणाम दिसून आला. कालप्रमाणेच आजही सोन्याचे दर खाली घसरले. सोमवार 4 में रोजी सोन्याची किंमत समोर आली आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या 1 ग्रॅमची किंमत 15,113 रुपये आहे तर 10 ग्रॅमसाठी 1,51,130 रुपये दर आहे. चांदीच्या दरातही घसरण सुरू असून, त्यामुळे बाजारात विविध कल दिसून येत आहेत. आंतरराष्ट्रीय दरांमध्येही किंचित घट दिसून येत आहे. चला तर मग, आज तुमच्या शहरातील सोन्याचा आणि चांदीचा भाव जाणून घेऊया.
◉ MCX वर गोल्ड फ्यूचर्स (05 जून 2026) ची किंमत 1,51,130.00 रुपये इतकी आहे.
◉ त्यात 222 रुपये किंवा 0.15% ची घसरण झाली आहे.
◉ ओपन इंटरेस्ट विश्लेषणानुसार, बाजारात शॉर्ट बिल्ड-अप दिसून येत आहे, म्हणजेच किंमत कमी होत असताना नवीन शॉर्ट पोझिशन्स तयार केल्या जात आहेत.
◉ ट्रेडिंग व्हॉल्यूम ३५५ होता, तर बिड 1,51,185 रुपये आणि आस्क प्राईस अंदाजे 1,51,207 रुपयांच्या आसपास होती.
चांदी
◉ MCX वर सिल्व्हर फ्यूचर्स (03 जुलै 2026) ची किंमत 2,50,546.00 इतकी आहे.
◉ त्यामध्ये 391 रुपये किंवा 0.16 % घसरण झाली.
◉ ओपन इंटरेस्ट विश्लेषणानुसार, बाजारात ‘लॉन्ग अनवाइंडिंग’ होत आहे, म्हणजेच किंमत घसरत असताना पूर्वी घेतलेल्या लॉन्ग पोझिशन्स बंद केल्या जात आहेत.
◉ ट्रेडिंग व्हॉल्यूम 20,520 होता, तर बिड 2,50,566 रुपये आणि आस्क प्राइस 2,50,649 रुपयांच्या जवळपास आहे.
रिटेल मार्केटमध्ये सोनं -चांदी
आज भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदी या दोन्हींच्या दरात घट झाली आहे. सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,51,570 रुपये असून, त्यात 260 किंवा 0.17 % घट झाली आहे. चांदीचा भाव प्रति किलो 2,50,650 रुपयांपर्यंत घसरला असून, त्यात 570 रुपये किंवा 0.23% घट झाल्याचे दिसून आलं.