सोन्याच्या दरात मोठा बदल! प्रति तोळ्यामागे तब्बल ''इतके'' वाढले, जाणून घ्या आजचे दर
सोन्याच्या दरात मोठा बदल! प्रति तोळ्यामागे तब्बल ''इतके'' वाढले, जाणून घ्या आजचे दर
img
Nandini khandare More

गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात अनेक चढ उतार होत असून आता आज जळगावच्या सुवर्णनगरीत सोने-चांदीच्या किंमतींमध्ये पुन्हा एकदा मोठी तेजी पाहायला मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून घसरणीचा कल असलेल्या सराफा बाजाराने आज अचानक यू-टर्न घेतलेला यामध्ये पाहायला मिळाला, डॉलर मजबूत झाल्याचा परिणाम थेट सोन्या-चांदीच्या किमतींवर झाला आहे.

आज सकाळी बाजार सुरू होताच सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ झाली, तर चांदीच्या दराने मोठी झेप घेत एका दिवसात तब्बल ₹९ हजारांची वाढ नोंदवली. या अचानक झालेल्या दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, दागिने खरेदीचा विचार करणाऱ्यांचे बजेटही कोलमडले आहे.

सोने तज्ज्ञ किरण पाटील यांच्या मते, आजचा जीएसटीविना दर पाहता, सोने प्रति किलो ₹१,४५,०००, तर चांदी प्रति किलो ₹२,२८,००० इतकी नोंद झाली आहे. सराफा व्यावसायिकांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरची मजबुती आणि गुंतवणूकदारांचा वाढलेला कल यामुळे सोन्या-चांदीच्या दरात ही तेजी दिसून आली आहे. आगामी काही दिवसांतही दरात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group