२८ एप्रिल २०२६
सोन- चांदीच्या किमतीत आज घसरण झाली की भाव वाढली? काय आहेत आजचे दर जाणून घ्या. सोनं आणि चांदीच्या किंमतीत काल म्हणजेच 27 एप्रिल रोजी तेजी पाहायला मिळाली होती.
आज 28 एप्रिलला सोनं-चांदीच्या किंमती या कमी झाल्या आहेत. एमसीएक्सवर सोन्याचा भाव 60 रुपयांच्या घसरणीसह 151655 रुपये प्रति 10 ग्रामवर व्यवहार करतोय. तर चांदीचा भाव 1200 रुपयांनी खाली येऊन 240619 रुपये प्रति किलोग्राम वर आला आहे. इंटरनॅशनल मार्केटमध्येही सोन्यााचा भाव कमी झाला आहे.
सोन्याचा भाव 0.17 टक्क्यांनी खाली येऊन 4685 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करतोय. चांदीमध्येही घसरण पाहायला मिळतेय. सिल्व्हरचा रेट 0.56 टक्क्यांनी खाली येऊन 74.601 वर ट्रेड करतोय. मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार, दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,53,850 रुपये प्रति 10 ग्राम आहे.
तर 22 कॅरेट सोनं हे 1,41,040 रुपये प्रति 10 ग्रामवर मिळतंय. तसंच मुंबई आणि कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,40,890 रुपये आणि 24 कॅरेट सोनं हे 1,53,700 रुपये प्रति 10 ग्रामवर आहे. दुसरीकडे चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोनं 1,55,250 रुपये आणि 22 कॅरेट सोनं 1,42,310 रुपये प्रति 10 ग्रामवर आहे.
तर पुणे आणि बंगळुरूमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,53,700 रुपये आणि 22 कॅरेट सोनं 1,40,890 रुपये प्रति 10 ग्रामवर विकलं जातंय. चांदीच्या किंमतींविषयी बोलायचं झाल्यास, चैन्नई आणि हैदराबादमध्ये चांदीची किंमत जवळपास 2,69,900 रुपये प्रति किलोग्राम आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता, यूपी, बिहार सारख्या परिसरांमध्ये चांदीचा भाव जवळपास 2,59,900 रुपये प्रति किलोग्रामवर आला आहे.
Copyright ©2026 Bhramar