सोनं महागलं की स्वस्त झालं ? सोन्याचे आजचे दर काय ? जाणून घ्या
सोनं महागलं की स्वस्त झालं ? सोन्याचे आजचे दर काय ? जाणून घ्या
img
वैष्णवी सांगळे
सोनं-चांदीच्या दरांपासून ते सेन्सेक्स-निफ्टी या दोन्ही शेअर बाजार निर्देशांकांपर्यंत, गुरुवारी सुरुवातीपासूनच मंदीचं चित्र दिसत आहे. काल बाजार बंद होईपर्यंत वेगाने वाढणारी चांदी, आज मात्र एमसीएक्स उघडताच अचानक 5000 रुपयांपेक्षा जास्त प्रति किलोने स्वस्त झाली, तर सोन्याचे दरही कोसळले. दुसरीकडे सेन्सेक्स-निफ्टीची हालचाल बदललेली दिसत होती, खरंतर सकाळी दोन्हीही जोरदार गतीने उघडले, परंतु काही मिनिटांतच ही गती मंदावली आणि ते रेड झोनमध्ये आले.

लागोपाठ ३ दिवस सोन्याच्या दरात मोठी वाढ नोंदवण्यात आली होती. आज अखेर या दरवाढीला ब्रेक लागला असून सोन्याच्या किंमतीत घसरण नोंदवण्यात आली. गुरूवारी सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किंमतीत कपात नोंदवण्यात आली. गुंतवणूकदारांनी उच्च पातळीवर नफा बुकिंगचा पर्याय निवडल्याने कपात झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याशिवाय देशांतर्गत सराफा बाजारातही सोन्याच्या किमती घसरल्या.

भारतात आज २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम १६,१६८ रुपये आहे. तर २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम १४,८२० रुपये आहे. १८ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम १२,१२६ रुपयांवर पोहचली आहे. 18k, 22k, 24k कॅरेट सोन्याची आजची किंमत किती आहे?

२४ कॅरेट सोन्याचे दर 
१ ग्रॅम- ₹16,168 - २१ रूपयांनी स्वस्त

८ ग्रॅम - ₹1,29,344 - १६८ रूपयांनी स्वस्त

१ तोळे - ₹1,61,680 - २१० रूपयांनी स्वस्त

१० तोळे - ₹16,16,800 - २१०० रूपयांनी स्वस्त


२२ कॅरेट सोन्याचे दर 
१ ग्रॅम- ₹14,820 - २० रूपयांनी स्वस्त

८ ग्रॅम - ₹1,18,560 - १६० रूपयांनी स्वस्त

१ तोळे - ₹1,48,200 - २०० रूपयांनी स्वस्त

१० तोळे - ₹14,82,000 - २००० रूपयांनी स्वस्त


१८ कॅरेट सोन्याचे दर 
१ ग्रॅम- ₹12,126 - १६ रूपयांनी स्वस्त

८ ग्रॅम - ₹97,008 - १२८ रूपयांनी स्वस्त

१ तोळे - ₹1,21,260 - १६० रूपयांनी स्वस्त

१० तोळे - ₹12,12,600 - १६०० रूपयांनी स्वस्त



इतर बातम्या
Join Whatsapp Group