अवघ्या 12 तासांत चांदीच्या दरात तब्बल 2 हजार रुपयांची उसळी, सोन्याचा भाव काय ?
अवघ्या 12 तासांत चांदीच्या दरात तब्बल 2 हजार रुपयांची उसळी, सोन्याचा भाव काय ?
img
दैनिक भ्रमर


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोन्याच्या खरेदीबाबत केलेल्या आवाहनाची देशभर चर्चा सुरू असतानाच सराफा बाजारात मात्र उलट चित्र पाहायला मिळत आहे. जागतिक आर्थिक घडामोडी आणि सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढता कल यामुळे MCX वर सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये मोठी वाढ नोंदवली गेली आहे.

मंगळवारी सकाळपासून अवघ्या काही तासांत सोन्याच्या दरात वाढ झाली असून प्रति 10 ग्रॅमचा भाव 1.53 लाखांच्या पुढे गेला आहे. चांदीनेही जोरदार उसळी घेत प्रति किलो दरात दोन हजार रुपयांहून अधिक वाढ नोंदवली. त्यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघांमध्येही उत्सुकता वाढली आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरमधील चढ-उतार, महागाईचा दबाव आणि जागतिक राजकीय घडामोडींचा थेट परिणाम मौल्यवान धातूंवर होताना दिसत आहे. अमेरिकेतील व्याजदर कपातीबाबतची अनिश्चितता तसेच अमेरिका-चीन संबंधांवरील चर्चांमुळे गुंतवणूकदारांचा कल पुन्हा सुरक्षित पर्यायांकडे वळत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

चांदीच्या किंमतीत गेल्या काही दिवसांत सातत्याने वाढ होत असून काही शहरांमध्ये दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. बाजारातील तेजीमुळे किरकोळ ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असले तरी लग्नसराई, सण-उत्सव आणि गुंतवणुकीसाठी सोन्याची मागणी कायम असल्याचे चित्र आहे.

जळगाव सारख्या सुवर्ण बाजारांसाठी प्रसिद्ध शहरांमध्येही या चर्चेचा परिणाम जाणवत आहे. काही व्यापाऱ्यांच्या मते ग्राहक खरेदीबाबत थोडे सावध झाले असले तरी महिलांकडून दागिन्यांची मागणी अद्याप कायम आहे. सोनं ही केवळ गुंतवणूक नसून भारतीयांच्या परंपरा आणि भावनांशी जोडलेली गोष्ट असल्याने बाजारातील हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




इतर बातम्या
Join Whatsapp Group