लग्नाचा 'बजेट' कोलमडलं! सोन्याची दीड लाखांकडे वाटचाल, तर चांदी अडीच लाखांच्या पार; ऐन लग्नसराईत सोन्याचा मोठा दणका
लग्नाचा 'बजेट' कोलमडलं! सोन्याची दीड लाखांकडे वाटचाल, तर चांदी अडीच लाखांच्या पार; ऐन लग्नसराईत सोन्याचा मोठा दणका
img
नितीशा कुलकर्णी






सोन्या-चांदीच्या दरांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा 'ब्लास्ट'! जागतिक बाजारातील घडामोडींचा असा काही परिणाम झाला की, गेल्या अवघ्या २४ तासांत सोन्याने ३,२०० तर चांदीने तब्बल १०,००० रुपयांची ऐतिहासिक झेप घेतली आहे. सोन्याचा भाव आता दीड लाखांच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचला असून, ऐन लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांच्या आनंदावर विरजण पडलं आहे. दरवाढीचे सर्व जुने विक्रम मोडीत काढणारा हा 'गोल्डन' झटका सर्वसामान्यांचे बजेट कोलमडवणारा ठरणार आहे.

मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दराला ब्रेक लागला होता. मात्र, यु्द्ध संपुष्टात येण्याचे स्पष्ट संकेत दिसू लागताच सोनं-चांदीच्या दरात मोठी उसळण दिसू लागली आहे. चांदीच्या दरात मागील २४ तासांत १० हजार रुपयांची मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरातही वाढ झाली आहे. सोन्या-चांदीच्या दरांनी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. गेल्या अवघ्या २४ तासांत सोन्याच्या दरात ३,२०० रुपयांची मोठी वाढ झाली आहे, तर चांदीने चक्क १०,००० रुपयांची झेप घेतली आहे. यामुळे ऐन लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे.

सोन्याची दीड लाखांकडे वाटचाल

जीएसटीशिवाय सोन्याचा दर १,४७,८०० रुपयांवरून थेट १,५१,००० रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरात १० हजार रुपयांची वाढ झाल्याने प्रतिकिलोचा दर २,४५,००० रुपयांवरून २,५५,००० रुपयांवर पोहोचला आहे. आज ७ मे रोजी २४ कॅरेटसह २२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या किमतीतही लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे.

सोन्यामध्ये दरवाढ का झाली?

आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्सच्या रिसर्च ॲनालिस्ट वेदिका नरवेकर यांच्या मते, सोन्याच्या किमतीत झालेली सुधारणा ही प्रामुख्याने खालच्या स्तरावर झालेली खरेदी आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरणीमुळे दिसून आली आहे. 'हॉर्मुजची सामुद्रधुनी' बाबतची चिंता काहीशी कमी झाल्याने कच्च्या तेलाच्या किमतींवर दबाव आला, परिणामी महागाईची तातडीची भीती कमी झाली आणि याचा सकारात्मक पाठिंबा सोन्याला मिळाला. मात्र, त्यांच्या मते सोन्यातील ही तेजी सध्या मर्यादित राहू शकते; कारण भौगोलिक-राजकीय तणाव अद्याप पूर्णपणे निखळलेला नाही आणि मधूनमधून घडणाऱ्या घटना बाजाराला सावध करत आहेत. त्यांच्या मते, सध्या सोन्याच्या किमतींवर जागतिक आर्थिक परिस्थितीचा प्रभाव अधिक गडदपणे जाणवत आहे.

प्रमुख शहरांमधील आजचे सोन्याचे दर

(प्रति ग्रॅम): गुड रिटर्न्सच्या अहवालानुसार, आज २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम १५,२४६ रुपयांवर आहे. जर तुम्ही २२ कॅरेट सोन्याचे दागिने घडवणार असाल, तर १० ग्रॅमसाठी सुमारे १,३९,७५० रुपये मोजावे लागतील (यामध्ये मेकिंग चार्जेस आणि जीएसटीचा समावेश नाही).

इतर बातम्या
Join Whatsapp Group