२७ एप्रिल २०२६
सोने-चांदिच्या भावात रोज चढ उतार पाहायला मिळतो. आजचे दर काय आहेत भाव वाढला की कमी झाला जाणून घ्या. सोनं आणि चांदीच्या भावात 27 एप्रिल रोजी तेजी पाहायला मिळाली. एमसीएक्सवर सोनं आणि चांदी दोन्हीतही किरकोळ वाढ झालीये.
सोन्याचा भाव 246 रुपये प्रति 10 ग्रामने वाढून 152945 रुपयांवर ट्रेड करतोय. चांदीचा भाव 764 रुपयांनी वाढून 245400 रुपये प्रति किलोवर व्यवहार करतोय. इंटरनॅशनल मार्केटमध्ये सोन्याच्या किंमती 0.04 टक्क्यांच्या वाढीसह 4,743 डॉलर प्रति औसंवर ट्रेड करतोय आणि चांदी 0.13% च्या वाढीसह 76.475 वर व्यवहार करतोय. सोमवारी सोन्याच्या किंमतीत किरकोळ तेजी पाहायला मिळतेय. कारण मजबूत अमेरिकन डॉलरमुळे सोनं गुंतवणुकदारांसाठी कमी आकर्षक झालंय.
यासोबतच कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढीने महागाईची चिंता वाढली आहे. दरम्यान अमेरिका आणि इरामध्ये शांती वार्तामध्ये प्रगतीन झाल्याने बाजारात अनिश्चितता कायम आहे. ज्याचा परिणाम सोन्याच्या किंमतींवर झालाय. मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार, दिल्लीत सोन्याचे भाव उच्च स्तरावर कायम आहे.
येथे 24 कॅरेट सोन्याची किंमत जवळपास 1,54,180 रुपये प्रति 10 ग्राम आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत जवळपास 1,41,340 रुपये प्रति 10 ग्राम आहे. मुंबई आणि कोलकातामध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव जवळपास 1,54,030 रुपये आणि 22 कॅरेटचा रेट 1,41,190 रुपये प्रति 10 ग्राम आहे.
चांदीच्या किंमतींविषयी बोलायचं झाल्यास, दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, कोलकाता, यूपी, बिहार आणि चंदीगडसह अनेक शहांमध्ये चांदीचा भाव 2,59,900 रुपये प्रति किलोवर राहिला आहे. सोने आणि चांदीच्या किंमतीत एक्सपर्टचा सल्ला : येत्या काळात सोन्याची परिस्थिती कशी असेल याविषयी एक्सपर्ट्स सांगतात की, सोन्याला खालच्या पातळीवर काही प्रमाणात सपोर्ट मिळू शकतो, पण अमेरिकी डॉलर मजबूत राहिला आणि जिओ-पॉलिटिकल तणाव कमी झाला तर यामध्ये आणखी घसरणही येऊ शकते.
त्याउलट, चांदी, जी एक मौल्यवान धातू तसेच औद्योगिक धातू आहे, तिच्या किमतीत जास्त चढउतार होण्याची शक्यता आहे. खरंतर, पश्चिम आशियामध्ये, विशेषतः होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या आसपास तणाव असाच वाढला, किंवा मग प्रमुख मध्यवर्ती बँकांनी नरम भूमिका घेतली तर सोने आणि चांदी या दोन्हींच्या खरेदीमध्ये पुन्हा वाढ होऊ शकते.
Copyright ©2026 Bhramar