धर्मांतराच्या कटात निदा खानचा हात? नाशिक पोलिसांची विशेष पथके रवाना; आयटी क्षेत्रातील मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश!
धर्मांतराच्या कटात निदा खानचा हात? नाशिक पोलिसांची विशेष पथके रवाना; आयटी क्षेत्रातील मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश!
img
नितीशा कुलकर्णी












नाशिक मधील बहुचर्चित ‘टीसीएस’ प्रकरणात सध्या रोज नविन खुलासे होत आहेत. या प्रकरणाणे आता वेग घेतला असून या बाबत आणखी एक धक्कादायक माहीती समोर आली आहे. धर्मांतराच्या कटात निदा खान हिचा हात असल्यााचे पोलीस तपासातून समोर आले आहे. यापूर्वी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात तिचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला होता. त्यामुळे आता शहर पोलिसांची विशेष तपास पथके तिचा शोध घेत असून राज्यभरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

राज्यभरात 'या' प्रकरणामुळे खळबळ
टीसीएस प्रकरण  हे गेल्या काही दिवसांपासून राज्यभर चर्चेचा विषय ठरले आहे.  कर्मचाऱ्याने केलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली. तपासादरम्यान धर्मांतरासाठी दबाव, मानसिक त्रास तसेच कट रचल्याचे आरोप पुढे आले होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सखोल तपास सुरू केला असून याबाबत अनेक धागेदोरे समोर येत  आहेत.

मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
टीसीएसमध्ये सिनिअर अॅनालिस्ट डायलर म्हणून कार्यरत असलेल्या तत्कालीन पुरुष कर्मचाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून २ एप्रिल रोजी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात सुरुवातीला काही व्यक्तींवर संशय व्यक्त करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी आणि रझा मेमन या चौघांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयाने सुरुवातीला बारा ते पंधरा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. या कालावधीत पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केली. मोबाईल डेटा, कॉल रेकॉर्ड, सोशल मीडिया चॅट्स तसेच आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्यात आली.

धर्मांतर प्रकरणात निदा खानचा हात?
पोलिस तपासादरम्यान चौघा आरोपींसह निदा खान हिचाही धर्मांतर प्रकरणात सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. तपास यंत्रणांना मिळालेल्या पुराव्यांमुळे निदा खानचा पाय खोलात गेला आहे . देवळाली कॅम्प प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी निदा खानने न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयाने तो फेटाळून लावल्याने तिच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. पोलिसांनी तिचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार केली असून शहरासह राज्यातील विविध ठिकाणी तपास सुरू आहे.

पोलिसांकडून डिजिटल पुरावे आणि संबंधित व्यक्तींची चौकशी 
या प्रकरणातील अटकेत असलेले सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्यांना मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, तपास यंत्रणा या प्रकरणातील आणखी काही धागेदोरे तपासत आहेत. पोलिसांकडून डिजिटल पुरावे आणि संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group