लागवडीला खर्च ४० हजार, पण पदरी मिळतात फक्त काही शे रुपये! कांदा उत्पादक शेतकऱ्यांची थट्टा थांबणार कधी? केंद्र सरकारचे धरसोड धोरण आणि बाजार समितीतील व्यापाऱ्यांची उदासिनता यामुळे नाशिकचा शेतकरी आज रस्त्यावर आला आहे. ज्या नगदी पिकाने सुबत्ता आणायला हवी होती, त्याच कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्याने आपला माल रस्त्यावर फेकून दिला आहे. लिलाव न पुकारताच निघून जाणाऱ्या व्यापाऱ्यांमुळे हवालदिल झालेल्या एका शेतकऱ्याची हृदयद्रावक कहाणी...
मनमाडसह जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समीतींमध्ये कांद्याच्या भावात सुरु असलेली घसरण थांबत नसल्याने शेतकरी अक्षरशा हवालदिल झाले आहे कष्टाने पिकवलेल्या कांद्यास मातीमोल भाव मिळत असल्याने रस्त्यावर कांदा फेकत शेतकर्यांनी आपला संताप व्यक्त केला. दरम्यान आज कांद्याला प्रती क्विंटल कमीत कमी ३०० ते ४०० रुपये तर सरासरी ८०० ते १००० हजार रुपये भाव मिळाला.लहान गोल्टी कांद्याला प्रती किलो फक्त १ रुपया भाव मिळाला.
कष्टाने पीकविलेल्या कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्याचे पाहून शेतकर्याने रस्त्याच्या कडेला कांदा फेकून दिला. धार्मिक स्थळासोबत जिल्हा कांदा, द्राक्षे,डाळिंबसाठी प्रसिद्ध आहे कांदा हा नगदी पिक मानला जातो कांद्याची लागवड खरीप हंगामात जून ते ऑक्टोबर, रब्बी हंगामात नोव्हेंबर ते फेब्रुवारी आणि उन्हाळी हंगामात जानेवारी ते जून महिन्यात केली जाते मनमाडसह जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करतात.
मात्र गेल्या काही वर्षा पासून कांद्याच्या बाबतीत केंद्र शासनाचे धर,सोड धोरणांचा फटका शेतकरऱ्यांना बसत असून कांदा वांदा करीत आहे. सध्या चांगल्या कांद्याला प्रती क्विंटल ३०० ते ४०० रुपये तर सरासरी ८०० ते १००० हजार भाव मिळत असून गोल्टी कांद्याला तर १०० रुपये इतकाच भाव मिळत आहे.एक एकर कांदा लागवडीला सुमारे ४० ते ४५ हजार रुपये पेक्षा जास्त खर्च होतो मात्र आज जे भाव मिळत आहे त्यात लागवडीवर केलेला खर्च देखील निघत नसल्याने उत्पादक हताश झाले आहेङ्गङ्ग भाव वाढतील या आशेवर अनेक शेतकर्यानी हजारो क्विंटल कांदा चाळीत साठवून ठेवलेला आहे मात्र यंदा मार्च महिन्याच्या सुरुवाती पासून सूर्य आग ओकू लागला होता एप्रिल आणि मे महिन्याच्या सुरुवातीला तापमानात मोठी वाढ होऊन पारा ४० अंशाच्या पुढे पर्यत गेला.वाढत्या तापमानाचा फटका शेतात उभी असलेली पिका सोबत चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्याला बसत असून हजारो क्विंटल कांदा सडू लागल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. नेहमी प्रमाणे यंदा ही उन्हाळ कांद्याची लागवड केली होती.लागवडसाठी एकरी सुमारे ४० हजार रुपये पेक्षा जास्त खर्च आला.
आज बाजार समितीत गोल्टी कांदा घेऊन आल्यानंतर बाजार समितीची रीतसर फी भरून पावती घेतली.. लिलाव सुरु झाल्यानंतर व्यापार्यांनी बाजूला असलेल्या ट्रॅक्टर मधील कांद्याचा लिलाव केला मात्र माझा कांदा लहान असल्यामुळे त्यांनी त्याचा लिलाव न पुकारता निघून गेले. नागापूर येथून ट्रॅक्टर मध्ये कांदा आणण्यासाठी डिझेल खर्च त्यानंतर ट्रॅक्टर मध्ये कांदा भरण्यासाठी मजुरांचा खर्च केला मात्र माझा कांदा व्यापार्यांनी घेतला नाही.
-शेतकरी