२८ एप्रिल २०२६
गाणी एकायला सर्वांनाच आवडते. पण म्हणतात ना जून ते सोन असतं हे अगदी खरं आहे अस म्हणायला हरकत नाही. 90 च्या दशकालील गाण्यावर लोक आजही तितकच प्रेम करतात. आजची बहूतांश तरून पिढी देखील 90 च्या दशकातील गाणी एकतात. असच एक या काळातील सुपरहीट गाणं जे आजही चाहत्यांच्या मनात घर करून आहे.
4 मिनिट 37 सेकंदाचं रोमँटिक गाणं, ज्याने 90 च्या दशकातील लोकांना प्रेम करायला शिकवलं, इतकं सुंदर की आजही लोक वेळ काढून ऐकतात. तुम्ही ऐकलं का? 90 च्या दशकात आणि 2000 च्या सुरुवातीच्या काळात हिंदी संगीतसृष्टीत रोमँटिक गाण्यांचे सुवर्णयुग पाहायला मिळाले.
त्या काळात अनेक सुंदर आणि मनाला भिडणारी गाणी आली, जी आजही प्रेक्षकांच्या मनात तितकीच लोकप्रिय आहेत. याच काळात प्रदर्शित झालेले 'पिया बसंती रे' हे गाणं आजही संगीतप्रेमींसाठी खास ठरते.
28 नोव्हेंबर 2000 रोजी रिलीज झालेले हे गाणं उस्ताद सुलतान खान आणि के. एस. चित्रा यांच्या सुरेल आवाजात सादर झाले होते. त्यामुळे या गाण्याला एक वेगळीच उंची प्राप्त झाली होती. ‘पिया बसंती रे काहे सताए आजा...’ या ओळींनी सुरू होणारे हे गाणं श्रोत्यांच्या हृदयाला भिडणारे आहे.
हे कोणत्याही चित्रपटाचा भाग नसून पिया बसंती या इंडीपॉप अल्बममधील टायटल ट्रॅक आहे. त्या काळात इंडीपॉपला मोठी लोकप्रियता मिळत असताना या गाण्याने अल्पावधीतच प्रचंड यश मिळवले. रिलीज होताच हे गाणे चार्ट्सवर अव्वल स्थानावर पोहोचले आणि विशेषत तरुणांमध्ये खूप लोकप्रिय झाले.
या गाण्याला 2001 मध्ये MTV Video Music Awards मध्ये ‘इंटरनॅशनल व्ह्यूअर्स चॉइस अवॉर्ड’ मिळाला होता. तसेच, हा अल्बम ‘गोल्ड डिस्क’ हिट ठरला आणि संपूर्ण वर्षभर गाजत राहिला. आजही हे गाणे रेडिओ, म्युझिक प्लेलिस्ट आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ऐकले जाते. 90 च्या दशकातील पिढीसाठी हे गाणे आठवणींचा खजिना आहे.
Copyright ©2026 Bhramar