लक्षावधींच्या गाड्या अन् एकच नंबर! थलपती विजयच्या '०२७७' आकड्यामागे दडलंय बहिणीच्या आठवणींचं भावूक विश्व
लक्षावधींच्या गाड्या अन् एकच नंबर! थलपती विजयच्या '०२७७' आकड्यामागे दडलंय बहिणीच्या आठवणींचं भावूक विश्व
img
नितीशा कुलकर्णी






तामिळनाडूच्या राजकारणात आणि चित्रपटसृष्टीत 'थलपती' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजयच्या प्रत्येक गाडीवर एकच नंबर प्लेट दिसते – '०२७७'. अनेकांना वाटले की हे त्याचे लकी नंबर असतील, पण या आकड्यांमागे विजयाचा आनंद नाही, तर एक ओलं दु:ख दडलं आहे. ४ मे २०२६ रोजी राजकीय विजय मिळवणाऱ्या या सुपरस्टारच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान नातं आणि त्याच्या धाकट्या बहिणीची आठवण या एका नंबरमध्ये साठवलेली आहे. काय आहे यामागचं गुपित? वाचा सविस्तर...

4 मे 2026 ही तारीख थलपती विजयच्या आयुष्यात खूपच खास. त्याची चर्चित गर्लफ्रेंड त्रिशा कृष्णनचा बर्थडे आणि तिच्या वाढदिवशीच तामिळनाडू निवडणुकीत त्याचा विजय. पण याशिवाय थलपतीचं आणखी एका आकड्याशी खास कनेक्शन दिसून आलं. तो म्हणजे त्याच्या गाडीचा नंबर. तुम्ही विजयच्या आलिशान गाड्या पाहिल्या असतील किंवा त्याची प्रचार वाहनं पाहिली असतील तर त्यावर एक नंबर तुम्हाला आवर्जून दिसला असेल तो म्हणजे 0277. फक्त प्रवासासाठीच नाही तर तयाने तामिळनाडूच्या कानाकोपऱ्याच प्रचारही याच नंबरच्या गाड्यातून केला. विजयकडे आलिशान गाड्यांचं कलेक्शन आहे. एकेकाळी रोल्स रॉइस कारचा मालक असलेल्या विजयने आता आपल्या गॅरेजमध्ये लाखो रुपयांच्या अनेक गाड्या आणलेल्या आहेत. गेल्या काही वर्षांत तो अनेक आलिशान गाड्यांचा मालक बनला आहे.

यामध्ये बीएमडब्ल्यू इलेक्ट्रिक मॉडेल, लेक्सस एलएम आणि टोयोटा प्रीमियम वेफेअर यांचा समावेश आहे. तो कोणतीही गाडी वापरायचा, पण त्या सर्वांवर एकच नंबर पुन्हा पुन्हा येत होता, ही गोष्ट कोणाच्याही नजरेतून सुटली नाही. टीएन 14 एएच 0277 (बीएमडब्ल्यू), टीएन 14 एएल 0277 (लेक्सस), टीएन 14 एएम 0277 (वेलफायर), टीएन 14 एएस 0277 (पार्टीची प्रचार बस). अखेर हे नंबर जुळवून पाहिले तर 12-02-77 ही एक तारीख मिळते.

हा दिवस विजयच्या आयुष्यातील खास दिवस आहे. ज्याच्याशी त्याचं भावनिक नातं आहे. ही ती तारीख आहे, ज्यादिवशी विजयची धाकटी बहीण विद्याचा जन्म झाला होता. पण लहानपणीच तिचं निधन झालं. तिची आठवण म्हणून विजयच्या प्रत्येक गाडीवर तिच्या वाढदिवसाची तारीख असते. विजयची आई शोभा चंद्रशेखर यांनी एकदा सांगितलं होतं की, विजयची फक्त गाडीच नाही तर त्याने आपल्या मुलीचं जे नाव ठेवलं आहे, त्याचाही विद्याशी संबंध आहे. विजयने आपल्या मुलीचं नाव दिव्या साशा ठेवलं आहे. जे विद्या नावाशी खूप मिळतंजुळतं आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group