१० वर्षांनंतर किती बदलली सैराटची टीम? कोणी अभिनयात मारली बाजी, तर कोणी निवडली वकिलीची वाट!
१० वर्षांनंतर किती बदलली सैराटची टीम? कोणी अभिनयात मारली बाजी, तर कोणी निवडली वकिलीची वाट!
img
नितीशा कुलकर्णी





२०१६ साली सैराट चित्रपट खुपच गाजला होता. आज या चित्रपटाला १० वर्ष पुर्ण झाली आहे. या चित्रपटातील कलाकार  आता काय करतायेय ते कुठे असतात तुम्हाला माहित आहे का?  या फिल्ममधील आर्ची, परश्या, बाळ्या, सल्या, अनी, प्रिन्सची भूमिका साकारणारे आता कुठे आहेत आणि ते काय करतात जाणून घ्या.  सैराट फिल्मला 10 वर्षे झाली आहेत.

29 एप्रिल 2016 रोजी ही फिल्म रिलीज झाली होती. 10 वर्षांनंतरही या फिल्मची क्रेझ कायम आहे. या फिल्ममधील कलाकार आजही लोकांच्या लक्षात आहेत. फिल्मची मुख्य कलाकार आर्ची म्हणजे रिंकू राजगुरू तर सतत दिसते. पण या फिल्ममध्ये इतर कलाकार आता कुठे आहेत, ते काय करतात पाहुयात. सैराटची आर्ची म्हणजे रिंकू राजगुरूने सैराटनंतर आणखी बरेच प्रोजेक्ट्स केले. कागर, मेकअप, झुंड, आठवा रंग प्रेमाचा, झिम्मा 2 अशा फिल्ममध्ये ती दिसली. तसंच  हंड्रेड, 200 हल्ला हो या वेब सीरिजमध्येही तिने भूमिका केली.

तिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या फिल्म म्हणजे बेटर हाफची लव्ह स्टोरी, आशा आणि पुन्हा एकदा साडे माडे तीन. याशिवाय ती अनेक शो, मुलाखती, रिएलिटी शो, प्रमोशनल कार्यक्रमांमध्येही सहभागी होते.सैराटचा हिरो म्हणजे परश्या, आकाश ठोसर ज्याने सैराटनंतर फ्रेंडशिप अनलिमिटेड, लसट स्टोरीज, झुंड, घर बंदूक बिर्याणी अशा फिल्म आणि 1962 द वॉर इ द हिल्स या वेब सीरिजमध्ये दिसला. रिंकूप्रमाणे तो सोशल मीडियावर फार एक्टिव्ह नसतो. अधूनमधून ट्रेकिंग आणि वर्कआऊटचे फोटो शेअर करतो. 2025 मध्ये त्याने सैराटच्या निमित्ताने पोस्ट केली होती. तसंच त्याच्या आगामी बालशिवाजी फिल्मची झलकही तिथं दिसेल. परश्या आर्ची आली आर्ची.... सैराट फिल्ममधील हा सीन तुम्ही आयुष्यात विसरणार नाही.

परश्याला आर्ची आली सांगणारा लंगड्या बाळ्या म्हणजे अभिनेता तानाजी गलगुंडे ज्याने नंतर घर बंदुक बिरयानी, भिरकीत, माझा अगडबम आणि गॅस्ट सारख्या फिल्ममध्ये काम केलं. तसंच मन झालं बाजींद या मराठी मालिकेत आणि द ड्रामा कंपनी या कॉमेड शोमध्येही दिसला होता. परश्यासाठी मार खाणारा त्याचा मित्र सल्या म्हणजे सलीम शेखची भूमिका साकारणारा अरबाज शेखने सैराटनंतर फ्री हीट दणका, गस्त, बस्ता, झुंड यासारख्या चित्रपटांत महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. 'मन झालं बाजिंद' या टीव्ही मालिकेतही तो दिसला. सध्या सुरू असेलला 'मटका किंग' या वेब सीरिजमध्येही तो आहे. यात त्याने रफतार चहावाल्याची भूमिका साकारली आहे. आर्चीसोबत सतत दिसणारी तिची मैत्रीण म्हणजे अनी.

अभिनेत्री अनुजा मुळेने अभिनय क्षेत्रापासून दूर आहे, ती वकिलीच्या क्षेत्रात करिअर करत आहे. अनुजाने कायद्याचे शिक्षण पूर्ण केलं असून तिने वकिलीत 'मास्टर्स' पदवी मिळवली आहे. सोशल मीडियावर सक्रिय असून तिने आपल्या आस्क मी नाऊ सेशनद्वारे चाहत्यांना आपण वकिली करत असल्याची माहिती दिली होती. सैराटनंतर तिने कोणत्याही प्रोजेक्टमध्ये काम केलं नाही. पण भविष्यात चांगल्या भूमिका मिळाल्यास अभिनय करण्याचा तिचा विचार आहे. आर्चीचा भाऊ प्रिन्स म्हणजे अभिनेता सूरज पवारही सध्या अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. सैराटनंतर तो इतर काही मराठी चित्रपटांत आणि वेब सीरिजमध्येही झळकला आहे. त्याने गजेंद्र, फ्री हिट दणका यासारख्या चित्रपटांत अभिनय केला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group