एसीशिवाय घर कसं ठेवावं थंड? छताचा उकाडा कमी करण्यासाठी वापरा 'या' ४ स्वस्त आणि सोप्या टिप्स
एसीशिवाय घर कसं ठेवावं थंड? छताचा उकाडा कमी करण्यासाठी वापरा 'या' ४ स्वस्त आणि सोप्या टिप्स
img
नितीशा कुलकर्णी



उन्हाळा सुरू झाला की सगळीकडेच उष्णतेचे चटके लागायला सुरूवात होते. घराच्या भिंती, छत हे उन्हाळ्यात लवकर गरम होतात. बाहेरून घरात आलं की उष्नता अधिक जाणवते. छत इतक तापते की उन्हाचे चटके घरात ही जाणवू लागतात. खास खरून मे महिना सुरू झाला की, ही समस्या अधिक जाणवू लागते. 

अशा वेळी AC हाच एकमेव पर्याय वाटतो, पण हा पर्याय सगळ्यांसाठीच शक्य असेल असं नाही. पण थोड्या सोप्या आणि स्वस्त उपायांनीही तुम्ही घरातील उकाडा कमी करू शकता. पुढे अशाच काही सोप्या टिप्स दिल्या ज्या वापरून तुम्ही घराचं छत थंड ठेवू शकता.

'या' सोप्या टिप्स ठेवतील तुमचं घर थंड

टेरेसवर गार्डन तयार करा

छतावर झाडं ठेवली, तर उष्णता आपोआप कमी होते. माती आणि झाडं उन्हाची झळ कमी करतात आणि पाणी घातल्यावर बाष्पीभवनामुळे छत थंड राहायलाही मदत होते.

योग्य वेळी पाणी शिंपडा

छतावर पाणी टाकण्याची पारंपरिक पद्धत आजही खूप उपयोगी ठरते. पण हे पाणी संध्याकाळी किंवा सूर्यास्तानंतरच टाकलं तर फायदा होतो. दुपारच्या वेळी पाणी टाकलं तर उकाडा वाढू शकतो, त्यामुळे वेळेचं भान ठेवूनच छतावर पाणी टाका.

ओल्या गोण्या पसरवा

जाड गोण्या पाण्यात भिजवून छतावर टाकल्यास त्या हळूहळू वाफ होऊन उष्णता कमी करतात. हा खूप स्वस्त आणि सोपा उपाय आहे. छतावर पाण्याची टाकी किंवा मातीचे घट ठेवावे पाण्यामुळे छतावर थोडा गारवा तयार होतो, ज्याचा फायदा घरातील तापमान कमी करण्यासाठी होतो. हे उपाय वापरून तुम्ही अगदी कमी खर्चात घरातला उकाडा बऱ्यापैकी कमी करू शकता.

इतर बातम्या
Join Whatsapp Group