उन्हाळ्यात जेवणाची चव वाढवणारा 'चटपटीत कैरी भात'; १० मिनिटांत तयार होणारी खास रेसिपी!
उन्हाळ्यात जेवणाची चव वाढवणारा 'चटपटीत कैरी भात'; १० मिनिटांत तयार होणारी खास रेसिपी!
img
नितीशा कुलकर्णी









उन्हाळा म्हंटल की साध आणि हलक जेवन सर्वांना हव असत. त्यातच उन्हाळ्याला सुरूवाात झाली की सर्वांच्याच घरात कैरीचे वेगवेगळे पदार्थ बनवायला सुरूवात होते. बाजारात देखील मोठ्या प्रमाणावर कैऱ्यांची विक्री होते. कैरीच लोणचं, पन्ह, चटणी, भेळ या सारखे विवीध पदार्थ बनवले जातात. त्या पैकीच एक झटपट तयार होणारा आणि चविष्ट पदार्थ म्हणजे कैरीचा भात. तुम्ही कधी बनवला आहे का? आंबट, हलकी गोडसर आणि फोडणीची खमंग चव असलेला हा भात सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी उत्तम पर्याय ठरतो.  कैरीचा भात बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती काय आहे जाणून घ्या.

साहित्य
शिजवलेला भात, किसलेली कच्ची कैरी, हिरव्या मिरच्या, मोहरी, जिरं, कढीपत्ता पाने, शेंगदाणे, हळद, तेल, मीठ, कोथिंबीर, किसलेले खोबरे आणि कांदा हे साहित्य लागेल.

कृती
सर्वप्रथम कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं, आणि कढीपत्ता टाका. त्यानंतर शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या टाकून घ्या. त्यानंतर कांदा सुद्धा टाकून घ्या. हे सर्व साहित्य टाकून ते परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर मीठ आणि हळद घालून काही सेकंद परता. यानंतर किसलेली कैरी घालून ती दोन मिनिटे मंद आचेवर शिजू द्या. कैरी थोडी मऊ झाल्यावर तयार भात घालून सर्व मिश्रण हलक्या हाताने एकजीव करा. दोन ते तीन मिनिटे वाफ आल्यावर गॅस बंद करा. वरून कोथिंबीर आणि किसलेले खोबरे टाकून गरमागरम कैरीचा भात सर्व्ह करू शकता. कच्च्या कैरीमध्ये व्हिटॅमिन C मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे शरीराला थंडावा मिळण्यास मदत होते. तसेच पचनक्रिया सुधारण्यासाठीही कैरी उपयुक्त मानली जाते. भात मोकळा आणि गार असेल तर कैरीचा भात अधिक चविष्ट लागतो. इच्छेनुसार त्यात काजू आणि इतर ड्राय फ्रूट्स देखील टाकू शकता.

इतर बातम्या
Join Whatsapp Group