रोजच्या जेवनात किती तेल खावे किंवा किती प्रमाणात तेल खाणे आरोग्यासाठी योग्य आहे? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल ना तर मग जाणून घ्या काय सागतात आहारतज्ज्ञ. नक्की किती तेल खाणं आरोग्यासाठी सुरक्षित आहे? आपण गरजेपेक्षा जास्त तेल तर वापरत नाही ना? आहारतज्ज्ञ आणि डॉक्टरांनी चार जणांच्या कुटुंबासाठी तेलाच्या वापराचं एक सोपं गणित मांडलं आहे.
हे गणित समजून घेतलं तर तुम्ही तुमच्या कुटुंबाला गंभीर आजारांपासून दूर ठेवू शकता. स्वयंपाकघर आणि तेल यांचं एक अतूट नातं आहे. मग ती चमचमीत भाजी असो, रविवारची बिर्याणी किंवा सणासुदीचे गोडधोड पदार्थ; तेलाशिवाय कशाचीच चव पूर्ण होत नाही.
पण हीच चव जेव्हा सवयीत बदलते, तेव्हा ती थेट तुमच्या हृदयावर वार करते. हल्लीच्या काळात वाढत्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे हृदयविकार आणि कोलेस्ट्रॉलच्या समस्या घरोघरी पाहायला मिळतात.
अशा वेळी अनेकांना प्रश्न पडतो की, नक्की किती तेल खाणं आरोग्यासाठी सुरक्षित आहे? आपण गरजेपेक्षा जास्त तेल तर वापरत नाही ना? आहारतज्ज्ञ आणि डॉक्टरांनी चार जणांच्या कुटुंबासाठी तेलाच्या वापराचं एक सोपं गणित मांडलं आहे. हे गणित समजून घेतलं तर तुम्ही तुमच्या कुटुंबाला गंभीर आजारांपासून दूर ठेवू शकता.
एका व्यक्तीला महिन्याला किती तेल हवे? आरोग्य तज्ज्ञांच्या आणि 'इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च' (ICMR) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एका सुदृढ व्यक्तीला दिवसाला साधारणपणे 3 ते 4 चमचे (15-20 ml) तेलाची गरज असते. या हिशोबाने विचार केला तर एका व्यक्तीला महिन्याला साधारण 500 ml म्हणजेच अर्धा लिटर तेल पुरेसे होते.
4 जणांच्या कुटुंबाचे गणित: जर तुमच्या घरात 4 व्यक्ती असतील, तर तुमच्या स्वयंपाकघरात महिन्याला जास्तीत जास्त 2 लिटर तेल वापरले जाणे अपेक्षित आहे. जर तुमचा वापर यापेक्षा जास्त असेल, तर तुम्ही धोक्याची पातळी ओलांडत आहात, असे समजावे.
जास्त तेल खाण्याचे गंभीर परिणाम अति प्रमाणात तेल वापरल्याने शरीरात खालील समस्या उद्भवू शकतात. कोलेस्ट्रॉलमध्ये वाढ: रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्याने रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात. हृदयविकाराचा धोका: हृदयाच्या धमन्या कडक होतात, ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. वजन वाढणे: तेलामध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पोटाचा घेरा आणि वजन वेगाने वाढते.
यकृताच्या समस्या: जास्त तेलकट पदार्थ खाल्ल्याने 'फॅटी लिव्हर'चा त्रास होऊ शकतो. या लोकांनी विशेष काळजी घ्यावी घरातील लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि ज्यांना आधीच मधुमेह (Diabetes) किंवा उच्च रक्तदाब (High BP) आहे, त्यांच्या आहारात तेलाचे प्रमाण अत्यंत कमी असावे. तळलेले पदार्थ जितके टाळता येतील तितके उत्तम.
कोणत्याही प्रकारचे तेल असो, ते अति प्रमाणात वापरणे शरीरासाठी विषासमान ठरू शकते. तेलाचा वापर कमी करण्यासाठी खास टिप्स नॉन-स्टिक पॅनचा वापर: यामध्ये खूप कमी तेलात भाज्या किंवा इतर पदार्थ तयार होतात. वाफवलेले पदार्थ: आहारात उकडलेल्या किंवा वाफवलेल्या (Steamed) पदार्थांचा समावेश वाढवा.
हे पचायला हलके आणि आरोग्यदायी असतात. एअर फ्रायर किंवा बेकिंग: तळण्याऐवजी बेकिंग किंवा एअर फ्रायरचा पर्याय निवडून तुम्ही 80% तेल वाचवू शकता. तेलाचा पुन्हा वापर टाळा: एकदा तळण्यासाठी वापरलेले तेल पुन्हा वापरणे कर्करोगासारख्या (Cancer) आजारांना निमंत्रण देऊ शकते.
महिन्याला केवळ 2 लिटर तेलाचे टार्गेट ठेवा. यामुळे तुमचे आरोग्य तर सुधारेलच, पण महिन्याचे बजेटही नियंत्रणात राहील. लक्षात ठेवा, अन्नाची चव तेलात नाही, तर ती बनवण्याच्या पद्धतीत आणि मसाल्यांच्या योग्य वापरात असते.