मटका खरेदी करताय? नुसता रंग पाहून फसू नका; पाणी थंड राहण्यासाठी मडक्यात 'हे' गुण असणे आहे गरजेचे
मटका खरेदी करताय? नुसता रंग पाहून फसू नका; पाणी थंड राहण्यासाठी मडक्यात 'हे' गुण असणे आहे गरजेचे
img
नितीशा कुलकर्णी





उन्हाळ्यात सर्वाधीक गरज भासते ती म्हणजे थंड पाण्याची सध्या राज्यातील उष्णता पाहता या वर्षी थंड पाण्याची अवश्यकता अधीक आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात गर्मी वाढली असून ग्राहक थंड पाण्यासाठी मटक्याला पसंती देत आहेत. कारण या मटक्यांमध्ये पाणी प्रचंड थंड होते. पण तुम्हाला माहिती आहे का की, कोणत्या मटक्यात जास्त पाणी थंड होते? राजस्थानातील भिलवाडा येथे वाढत्या उष्णतेमुळे पारंपरिक मातीच्या मडक्यांची मागणी पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे यंदा बाजारात काळा मटका की लाल मटका?

या चर्चेने जोर धरला असून ग्राहकांमध्ये कोणता मटका पाणी जास्त थंड ठेवतो याबाबत उत्सुकता वाढली आहे. उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असल्याने लोक पुन्हा नैसर्गिक थंडावा देणाऱ्या उपायांकडे वळत आहेत. फ्रिजसारख्या आधुनिक साधनांनंतरही मातीच्या मडक्यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. उलट, या दिवसांमध्ये बाजारात मडक्यांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

मडके तयार करणाऱ्या कारागिरांच्या मते, लाल मटका हा पारंपरिक प्रकार असून तो साध्या मातीपासून बनवला जातो. याची पृष्ठभाग किंचित छिद्रयुक्त असते, ज्यामुळे पाणी हळूहळू बाहेर झिरपते आणि त्याचे बाष्पीभवन होते. या नैसर्गिक प्रक्रियेमुळे मडक्यातील पाणी थंड राहते. लाल मडक्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो पाण्याला हलकी गोड चव देतो. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागात याची मागणी कायम टिकून आहे.

शिवाय, हा प्रकार स्वस्त असल्याने सर्वसामान्य ग्राहकांमध्ये तो अधिक लोकप्रिय आहे. दुसरीकडे, काळा मटका विशेष प्रक्रियेतून तयार केला जातो. तयार झाल्यानंतर तो भट्टीत वेगळ्या पद्धतीने भाजला जातो, ज्यामुळे त्याचा रंग काळा होतो. काळा मटका सूर्यप्रकाश कमी प्रमाणात शोषतो, त्यामुळे आतले तापमान संतुलित राहण्यास मदत होते. काहींच्या मते, सावलीत ठेवल्यास काळा मटका पाणी जास्त वेळ थंड ठेवतो.

तज्ज्ञांच्या मते, पाणी थंड होण्यामागे मडक्याचा रंग नाही तर त्याची माती, बनावट आणि गुणवत्ता महत्त्वाची असते. जर मटका चांगल्या प्रतीच्या मातीपासून आणि योग्य पद्धतीने तयार केला असेल तर तो कोणत्याही रंगाचा असला तरी पाणी थंड ठेवतो. म्हणूनच खरेदी करताना केवळ रंगावर न जाता मडक्याची गुणवत्ता तपासणे अधिक गरजेचे आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group