वॉशिंग मशीन वापरताना करू नका ‘या’ 2 मोठ्या चुका; नाहीतर घरात लागू शकते आग!
वॉशिंग मशीन वापरताना करू नका ‘या’ 2 मोठ्या चुका; नाहीतर घरात लागू शकते आग!
img
दैनिक भ्रमर

वॉशिंग मशीन वापरताना आपण अनेकदा घाईघाईत आपल्याकडून अशा काही चुका होतात ज्या जीवावर बेतू शकतात. या चुका टाळण्यासाठी आणि आगीच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी खालील माहिती तुम्हालाअत्यंत उपयुक्त ठरेल. वॉशिंग मशीन हे पाणी आणि वीज या दोन्हीवर चालणारे उपकरण आहे, त्यामुळे हे वापरतांना सर्वाधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक असते. अनेकदा आपण ओल्या कपड्यांना हात लावल्यानंतर किंवा बादलीतून पाणी भरताना त्याच ओल्या हातांनी मशीनचे बटण चालू किंवा बंद करतो. ही सर्वात मोठी चूक आहे.

जर मशीनच्या वायरमध्ये एखादा छोटा कट असेल किंवा सॉकेटमध्ये ओलावा असेल, तर ओल्या हातांमुळे तुम्हाला तीव्र शॉक बसू शकतो. तसेच, मशीनच्या आजूबाजूला पाणी साचलेले असल्यास ते मोटार किंवा अंतर्गत वायरिंगपर्यंत पोहोचून 'शॉर्ट सर्किट' होण्याचा धोका निर्माण होतो. 

आजच्या घराघरात वॉशिंग मशीन ही गरजेची गोष्ट झाली आहे. परंतु, ही एक अशी इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे, जिचा वापर पाण्याच्या संपर्कात येऊन होतो – आणि हीच बाब खूप काळजी घेण्यास भाग पाडते. कारण इलेक्ट्रॉनिक उपकरण आणि पाणी एकत्र आले, तर थोडीशी चूकही मोठा धोका निर्माण करू शकते.

अनेक जण वॉशिंग मशीन वापरताना छोट्या-छोट्या चुका करतात, ज्या नंतर मोटर बर्न होणं, धूर निघणं किंवा टोकाच्या परिस्थितीत मशीन ब्लास्ट होण्यास कारणीभूत ठरतात. अशा काही सामान्य पण घातक चुकांबाबत जाणून घेऊया.

ड्रेन पाइप वर ठेवणं

खूप वेळा लोक वॉशिंग मशीनच्या ड्रेन पाइपमधून पाणी लीक होताना पाहतात आणि त्यासाठी तात्पुरता उपाय म्हणून पाइपवर हुकला अडकवतात. पण ही एक अतिशय चुकीची आणि धोकादायक सवय आहे. पाण्याचा प्रवाह योग्य रितीने न झाल्यास तो मोटरपर्यंत पोहोचू शकतो आणि मोटरमधून धूर निघणं किंवा शॉर्ट सर्किट होणं शक्य आहे. त्यामुळे पाइपमधून पाणी गळत असेल, तर लगेच प्रोफेशनल सर्व्हिस घेणं गरजेचं आहे, नुसता पाइप उंच ठेवणं हा पर्याय नाही.

ओव्हरलोडिंग

खूप लोक कपडे इतके भरतात की त्यांना पाण्यात फिरायलाही जागा उरत नाही. यामुळे मोटर आणि गिअरबॉक्सवर जास्त ताण येतो, आणि काही काळातच मशीन बिघडते. एक साधा नियम लक्षात ठेवा कपडे क्लॉक आणि अँटी-क्लॉकवाइज फिरतायत का? जर नाही, तर कपडे कमी करा.

स्पिन करताना सावध

सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनमध्ये कपडे वेगळ्या टबमध्ये टाकून स्पिन करावे लागतात. गीले कपडे जर एकमेकात गुंतलेले टाकले, तर स्पिनरचा बॅलन्स बिघडतो आणि मशीनचे आतील भाग तुटण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे प्रत्येक कपडा सुटका करून नीट टाकणं आवश्यक आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group